कोकण

म्हशी देतो सांगून २ लाख ६३ हजाराची फसवणूक

CD

४७ (पान ३ साठी)

म्हशी देण्याच्या अमिषाने
अडीच लाखांची फसवणूक

गुजरात मधील दोघांवर गुन्हा ; तपास सुरू

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः दुध व्यवसायासाठी गुजरात येथून म्हशी देतो असे अमिष दाखवून २ लाख ६३ हजारांची फसवणुकीचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिस आदमभाई घांची उर्फ आबू व अमितभाई आदमभाई घांची (दोघेही रा. थराद, गुजरात) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना २८ ते २९ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसातच्या सुमारास वेतोशी येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, जगदीश कृष्णा झोरे (वय २९, रा. वेतोशी, धनगरवाडी, रत्नागिरी) हे दुध व्यावसायिक असून ते वेतोशी येथे म्हशी पाळून दुध विक्री करतात. त्यांना मुरा जातीच्या म्हशींची व्यवसायाकरिता गरज होती. त्यामुळे त्यांचा मित्राने गुजरात राज्यातून मुरा जातीच्या म्हशी खरेदी केलेल्या असल्याने त्यांचे व फिर्यादी यांचे ओळखीचे संशयित आबु व अमित भाई यांच्याशी त्यांनी मोबाईलवरुन संपर्क करुन दिला. त्याना मुरा जातीच्या म्हशी पाहिजेत असे कळविले. त्यांनी म्हशीचे फोटो व व्हिडिओ पाठविल्यानंतर जगदीश झोरे यांनी त्यापैकी सहा म्हशी पसंत करुन म्हशींची किंमत ठरवून संशयित अमितभाई यांना ऑनलाईन ९८ हजार रुपये पाठविले. त्यानंतर १ लाख ६५ हजार बँकेतून असे एकूण २ लाख ६३ हजार रुपये संशयितांना पाठविले. संशयितांनी म्हशी दोन दिवसात पाठवतो असे सांगून फसवणूक केली. या प्रकरणी जगदीश झोरे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

Maharashtra Ganesh Visarjan Live: पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप

डीपफेक फोटो प्रकरणी सीजेपीच्या दीपके, दास आणि रांका यांच्याकडे मागितले स्पष्टीकरण; दिल्ली उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT