कोकण

तीन तालुक्यात स्वराज्य प्रतिमांची खरेदी चढ्या दराने

CD

४० (पान ३ साठी, मेन)

स्वराज्य प्रतिमांची खरेदी चढ्या दराने

खेड, दापोली, संगमेश्वर तालुके नमले ; सरपंच संघटनेचा आक्षेप

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः शिव स्वराज्य दिन ६ जून रोजी साजरा करण्याच्या सूचना दिल्यानंतर स्वराज्य गुढी उभारतानाच प्रत्येक शासकीय कार्यालयात स्वराज्य प्रतिमा लावण्याचे आदेश देण्यात आल्यावर चिपळूण तालुक्यात सदर प्रतिमा ४००० रूपये दराने घेण्याचा घाट घातला गेला. त्यावर सरपंच संघटनेने आक्षेप घेतल्याने अनेक ग्रामपंचायतींनी सबंधीतांचे फर्मान धुडकावले. कराड येथून खेड आणि संगमेश्वर तालुक्यातही ४००० रूपये दराने प्रतिमा आणल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दापोली तालुक्यात हीच प्रतिमा ३५०० रूपये दराने घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे खरेदीबाबत चिपळूणप्रमाणे खेड, संगमेश्वर आणि दापोली तालुक्यातही फर्मान निघाले होते का? अशी चर्चा सुरू आहे.
गेल्या तीन वर्षापासून प्रत्येक शासकीय कार्यालयात शिव स्वराज्य दिन साजरा केला जात आहे. स्वराज्य गुढी उभारून हा दिन साजरा केला जात असतानाच यावर्षी स्वराज्य प्रतिमा व बोधचिन्ह शासकीय कार्यालयात लावण्याची सूचना शासनाने केली. त्या आधारे प्रथमतः स्वराज्य प्रतिमा खरेदी करण्यासाठी जिल्हाबाहेरील एकच पुरवठादार शोधण्यात आला. संबंधीत पुरवठादार हा एका अधिकाऱ्यांचा जवळचा असल्याने चढ्या दराने प्रतिमा खरेदी करण्याचा फतवा ग्रामपंचायतींना काढण्यात आला. मात्र त्यावर चिपळूण सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्षेप घेतला. चिपळुणातील बाजारपेठेत ही प्रतिमा पाचशे ते हजार रूपये दराने मिळत असताना चढ्या दराने खरेदीची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरपंच संघटनेने केलेल्या आवाहनास पाचशे ते एक हजार रूपये दराने काही ग्रामपंचायतींनी स्वराज्य प्रतिमा घेतल्याची माहिती आहे. मात्र संबंधीत अधिकाऱ्यांना दुखवायचे कसे, अशी भूमिका घेणाऱ्या ग्रामपंचायतींनी ४ हजार रूपये दराने तिच प्रतिमा घेतली आहे. चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि दापोली तालुक्यात तालुकास्तरावरच खरेदीचा निर्णय झाला. जिल्हा परिषदेकडून या साऱ्या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
..................
कोट

वस्तू खरेदी बाबतचा अधिकार ग्रामपंचायतींचा आहे. त्यामध्ये अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप योग्य नाही. त्यांच्या सूचना अंमलात आणल्या जातील. चिपळुणात स्वराज्य प्रतिमेबाबत सरपंच संघटनेने घेतलेल्या निर्णयामुळे तालुक्याचे ४ लाख रूपये वाचले. ग्रामपंचायतींना आयत्यावेळी ग्रामनिधीतून विविध उपक्रम घेण्यास सुचवले जातात. त्यासाठी शासनानेच निधीची तरतूद करावी.

- योगेश शिर्के, अध्यक्ष सरपंच संघटना, चिपळूण तालुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News : ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT