कोकण

पर्यटकास वाचविणाऱ्या मुलांचा मालवणात शिवसेनेतर्फे सत्कार

CD

swt328.jpg

मालवणः पर्यटकाला वाचविणाऱ्या मुलांचा शिंदे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पर्यटकास वाचविणाऱ्या मुलांचा
मालवणात शिवसेनेतर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : काही दिवसांपूर्वी येथील बंदर जेटी नजीक समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला वाचविणाऱ्या वरद सापळे, रुद्र गावकर, अंगद गावकर, हर्ष कुबल या पोहण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांचा व त्यांचे प्रशिक्षक प्रफुल्ल गवंडे यांचा शिवसेना शिंदे गट युवासेनेतर्फे सत्कार करण्यात आला. मुलांच्या या धाडसी कार्याचे व त्यामागे मेहनत घेणाऱ्या गवंडे यांच्या कार्याचे यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. सिंधुदुर्ग जिल्हा शिंदे गट युवासेनेच्यावतीने किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्काराचा कार्यक्रम भरड येथील श्री दत्त मंदिरात पार पडला. यावेळी शाल व श्रीफळ देऊन मुलांचा व प्रशिक्षक गवंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गवंडे यांनी मुलांच्या कार्याची दाखल घेऊन सत्कार केल्याबद्दल युवासेनेचे आभार मानले. या मुलांचे कर्तृत्व सर्वच मालवणवासीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार युवासेना पदाधिकाऱ्यांनी काढले. यावेळी शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवासेना जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, युवती सेना मालवण शहर प्रमुख प्रियांका मेस्त्री, अन्य शिवसैनिक तसेच पालक अरुण चोपडेकर, करुणा गावकर आदी उपस्थित होते.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Chatbox As Referee : जेन-झीच्या प्रेमात डिजिटल ट्विस्ट; भांडणं मिटवण्यासाठी AI बनतोय ‘पंच’, पॅचअपसाठी वाढतोय तरुणांचा विश्वास

Latest Marathi News Live Update : मिळालेल्या सीडीआरमध्ये AI टूल वापरून नाव शोधलीत - दमानिया

Thackeray group Kolhapur : कोल्हापुरात ठाकरे गट पुन्हा उभारी घेणार, मोठ्या नियोजनाच्या तयारीत

Satara Politics: साताऱ्यात भाजपचा पुन्हा धक्का! सभापतिपदेही मिळवली; राष्ट्रवादी- शिवसेनेचा बहिष्कार, मंत्री गाेरेंचे वर्चस्व..

Sugar industry: साखर उद्योगाला चालना मिळणार; डिझेलमध्ये ‘बायो-आयसोब्युटेनॉल’ मिश्रणाचा पर्याय, कार्यक्षमतेत कोणतीही तडजोड नाही!

SCROLL FOR NEXT