कोकण

राणे की राऊत आज फैसला

CD

राणे की राऊत आज फैसला
राज्याचे लक्ष; दोघांचेही विजयाचे ढोल तयार

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्ग- रत्नागिरी, ता. ३ : राज्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा निकाल उद्या (ता. ४) जाहीर होणार आहे. येथे नऊ उमेदवार रिंगणात असले तरी खरी टक्कर महाविकास आघाडीतील उबाठाचे उमेदवार विनायक राऊत आणि महायुतीचे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार असून, दुपारी तीनपर्यंत संपूर्ण निकाल हाती येईल. उद्या कोण बाजी मारणार याची प्रचंड उत्सुकता आहे. दोन्ही शहरांमध्ये राणे आणि राऊत यांचे विजयाचे ढोल तयार आहेत.
विनायक राऊत यांनी मराठा भवन, काही हॉटेल बुक केली आहेत. मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल झाले आहेत. नारायण राणे यांच्या महायुतीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल झाले आहे. त्यांनीही अनेक हॉटेल्स, लॉज बुक केले आहेत. दोन्ही उमेदवारांना निवडून येण्याचा विश्वास असल्याने ही तयारी केली आहे.
मतमोजणी रत्नागिरीत एमआयडीसीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात आहे. उद्या (ता. ४) सकाळी सहाला टपाली मतपत्रिकांची वाहतूक जिल्हा कोषागार कार्यालयातून मतमोजणी ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यानंतर मतमोजणी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे. सर्वप्रथम टपाली मतदानाची मोजणी होणार आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा संघनिहाय एकूण १४ टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे. चिपळूण विधानसभेमध्ये एकूण ३३६ मतदान केंद्रांमध्ये २४ फेऱ्या, रत्नागिरी विधानसभेमध्ये एकूण ३४७ मतदान केंद्रांमध्ये २५ फेऱ्या, राजापूरमध्ये ३४१ मतदान केंद्रांमध्ये २५ फेऱ्या, कुडाळमध्ये २७८ मतदान केंद्रांवर २० फेऱ्या, कणकवली ३३२ केंद्र २५ फेऱ्या तर सावंतवाडी ३०८ निवडणूक केंद्रांमध्ये २२ फेऱ्या होणार आहेत. मतमोजणीसाठी एक हजार १५८ इतक्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निवडणूक उमेदवाराचे ९९ प्रतिनिधी उपस्थित असतील. एक फेरी साधारण ६० हजारांवर मतांची मोजणी होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण ६३.०४ टक्के मतदान झाले होते. एकूण ९ लाख ७६ हजार ६१८ जणांनी मतदानाचा अधिकार नोंदवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT