कोकण

राणेंच्या विजयानंतर कणकवलीत जल्लोष

CD

87802

राणेंच्या विजयानंतर कणकवलीत जल्लोष
कणकवली, ता. ४ ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भरघोस मताधिक्याने विजयी झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी आज येथे जल्लोष केला. बहुतांश कार्यकर्ते रत्नागिरीकडे असले तरी येथे असलेल्या काही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणा देत राणेंच्या विजयाने आनंदात न्हाऊन गेल्याचे चित्र होते.
लोकसभा मतदारसंघातील ही निवडणूक राणेंच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची मानली गेली होती. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये अटीतटीची लढत दिसून आली. मात्र, निकालाच्या फेऱ्या सुरू झाल्या, तशी विजयाची आकडेवारी वाढत गेली. राणेंना प्रत्येक फेरीमध्ये मताधिक्य वाढत होते. त्यामुळे हळूहळू कार्यकर्ते कार्यालयाजवळ जमू लागले. आज येथे मंगळवारी आठवडा बाजार असला, तरी बाजारपेठेत फारशी गर्दी नव्हती. दुपारनंतर कार्यकर्त्यांची जमवाजमाव झाली. चौकाचौकांमध्ये कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली. राणेंच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कणकवली नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, बबलू सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजप कार्यालयाजवळ आले होते. त्यानंतर येथे मोठी घोषणाबाजीही करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: जवखेडा ठोंबरे येथे शेतकरी संवाद सभा

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT