कोकण

राजापूर-राजापुरात पावसाच्या सरी

CD

८७७७०
८७७७१

राजापुरात पावसाच्या सरी
उकाडा कायमः जैतापूरला झाड कोसळून शाळेचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ः राजापूर शहर आणि परिसरातील गावांमध्ये दुपारी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये पावसाचा शिडकावा न होता काही काळ ढगाळ तर काही काळ कडकडीत ऊन अशी स्थिती होती. पावसाच्या शिडकाव्यामुळे उकाडा मात्र कायम आहे. दरम्यान, जैतापूर येथे आंब्याचे झाड कोसळून येथील जिल्हा परिषद शाळेचे किरकोळ नुकसान झाले आहे.
गत महिन्यामध्ये तालुक्यात सातत्याने वळवाचा पाऊस पडला. वळवाच्या पावसाचा काही भागामध्ये तडाखा बसून नुकसानही झाले आहे. काही भागातील नैसर्गिक जलस्रोत वाढून त्या त्या भागातील पाणीटंचाईला दिलासा मिळाला आहे. आज सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश आणि ऊन होते; मात्र दुपारी अचानक वातावरणामध्ये बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले. दुपारी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. अर्ध्या तासाहून अधिक काळ पाऊस पडत होता; मात्र पाऊस थांबताच हवेमध्ये पुन्हा एकदा उकाडा निर्माण झाला होता.
शहर आणि परिसरामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या असल्या तरी पश्‍चिम भागातील गावांमध्ये कडाक्याचे ऊन आणि स्वच्छ सूर्यप्रकाश अशी स्थिती होती. आज सकाळी जैतापूर येथे आंबा कलमाचे मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये येथील शाळेचे किरकोळ प्रमाणात नुकसान झाले आहे; मात्र नुकसानीचा निश्‍चित आकडा समजू शकलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८० लाख पॅकेजची नोकरी AIमुळे गेली, IT इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं; शेवटची चिठ्ठी वाचून पत्नीनेही १८व्या मजल्यावरून मारली उडी

का झाला हृतिक रोशन- सुझान खानचा घटस्फोट? भाऊ जायेदने सांगितलं कारण, म्हणाला- हृतिकची गर्लफ्रेंड

Kurla Accident: कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, आरोपी बेस्ट बसचालकला अखेर जामीन; हायकोर्टाचा निर्णय

Team India Schedule: भारतीय संघ व्यस्तच राहणार...! इंग्लंड दौऱ्यानंतर या देशात टी२० मालिका खेळणार; BCCI कडून घोषणा

आनंदी मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीचा अनोखा उपक्रम; सकाळ वृत्तपत्राच्या सहाय्याने केला ब्रेल जाहिरातीचा अनोखा प्रयोग

SCROLL FOR NEXT