कोकण

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा मोठ्या भेगा

CD

-rat४p१४.jpg-
P२४M८७७७३
गुहागर ः चिखली, काजळीच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग काँक्रिटीकरणाला गेलेले मोठे तडे.
-----------

गुहागर-विजापूर महामार्गावर मोठ्या भेगा

चिखली ते देवघर ; पावसाळ्यात रस्त्याची अवस्था होणार बिकट

सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ४ : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिखलीपासून ते देवघरपर्यंत काँक्रिटीकरणाला अजूनही मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या दिसून येत आहेत. काही ठिकाणी या भेगांचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून येत आहे.
गुहागर -विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शहरातील भूसंपादन प्रक्रिया झाली असली तरी अजूनही प्रशासकीय पातळीवरील अनास्थेपोटी पुढील हालचाल थांबली आहे. मार्च महिन्यापर्यंत संबंधित जागामालकांना रक्कम मिळेल, असे वारंवार सांगणारे चिपळूणचे प्रांताधिकारी यांनाही याचा विसर पडलेला दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गाचे झालेल्या कामाच्या दर्जावर विचार करण्याची वेळ आली आहे. रात्रंदिवस राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी लक्ष ठेवून आलेल्या या कामाचा दर्जा ढासळला कसा सवाल उठत आहे. मनीषा कन्स्ट्रक्शनने केलेल्या या महामार्गाचे काँक्रिटीकरण अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या स्थितीत दिसून येत आहे. दोन भागामध्ये केलेल्या काँक्रिटच्या मध्यावरील पडलेली गॅप व कमी अधिक उंचीमुळे दुचाकी अपघात होण्याचीही शक्यता आहे.
चिखलीपासून ते देवघरपर्यंत मोठ्या प्रमाणात काँक्रिटला तडे गेले असून दिवसेंदिवस हे तडे आपली तोंड उघडत आहेत. तीन महिन्यापूर्वी काही ठिकाणचे खराब काँक्रिट काढून ठिगळ भरण्याचे काम या ठेकेदाराने केले होते. एवढेच नव्हे तर तडे गेलेल्या भागांमध्ये काँक्रिट भरले होते ते पुन्हा बाहेर आले असून हे तडे अधिक वाढले आहेत. यामुळे या पावसाळ्यामध्ये हे काँक्रिट टिकेल का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग अधिकारी या निकृष्ट कामाची दखल घेतील का, असेही बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

IND vs WI: रोहित शर्माचं शतक जेवेल अँड्र्यूच्या कॅचने फक्त ८ धावांनी हुकलं, पण ऋतुराजसोबत रचली विक्रमी भागीदारी

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Ayurveda Tips for Glowing Skin: महागड्या क्रीम्स नकोत! ग्लोइंग स्किनसाठी आयुर्वेदाच्या 'या' १० सवयी अंगीकारा

SCROLL FOR NEXT