कोकण

खेड-तटकरेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष

CD

87871
----------
तटकरेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष
सुरवातीपासूनच आघाडी; खेडमध्ये फटाके फुटले
खेड, ता. ४ : रायगड लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी विजयी पताका फडकवल्यानंतर दापोली विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. आज सकाळपासूनच दापोली-खेड-मंडणगड-चिपळूण येथील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग या ठिकाणी धाव घेतली.
आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरवातीच्या दोन-चार फेऱ्या सोडल्या तर नंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी त्यांनी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली. त्यामुळे महाविकास आघाडीचे अनंत गीते यांना त्यांनी दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला. आज दुपारी बारानंतर खेड शहर परिसरासह दापोली-मंडणगड येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरवून विजयाचा आनंद साजरा केला. शेवटच्या काही फेऱ्या शिल्लक असताना तटकरे यांनी याठिकाणी उपस्थिती लावली. त्या वेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढविली आणि विजय हस्तगत केला. त्यामुळे यापुढे अविरतपणे विकासाचा वारू रायगड लोकसभा मतदार संघात दौडत राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT