कोकण

शाळेत होणार आजी आजोबा दिवस साजरा

CD

शाळेत होणार आजी आजोबा दिवस साजरा
पावस ः भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्यसाधारण महत्व आहे. आजी आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधारस्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आता दरवर्षी शाळेत आजी आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी-आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी-आजोबांसोबत घालवतात. म्हणून आजी-आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणं आजच्या काळात महत्त्वपूर्ण असून हे नातं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचं आणि प्रेरणादायी आहे, असे सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. मुलांना शाळेबरोबरच आजी-आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्याची नव्याने ओळख होऊन दृढ होण्यासाठी हा दिवस साजरा होणं आवश्यक आहे. प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्‍या रविवारी हा दिवस साजरा केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू; मोहफुले वेचताना हल्ला, मृतदेह फरकटत नेऊन पायाचे लचके तोडलं अन्..

Malad East Mumbai Accident : मुंबईत पुन्हा एकदा 'खड्डा' ठरला कर्दनकाळ; बांधकाम व्यावसायिकाच्या एका चुकीमुळं 8 वर्षांच्या दिव्यांशचा करुण अंत, चेंडू काढायला गेला अन्...

Ashok Kharat: अन्यथा असे आणखी अशोक खरात उदयास येतील; उत्तर महाराष्ट्रात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त, संपत्ती लुटली, तरी सरकार निष्क्रिय!

Latest Marathi News Live Update : गंगापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान

Ashok Kharat Case : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार ? रुपाली पाटील यांच्या पोस्टने खळबळ

SCROLL FOR NEXT