कोकण

सुनील तटकरेंचा ८२ हजार ७८४ मतांनी विजय

CD

-rat४p३७.jpg ः
२४M८७९३७
अलिबाग : विजयी उमेदवार सुनील तटकरे यांना निवडून आल्याचे प्रमाणपत्र देताना व अभिनंदन करताना निवडणूक निर्णय अधिकारी.
----------

सुनील तटकरेंचा ८२ हजार ७८४ मतांनी विजय
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. ४ : रायगड लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले असून, त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा ८२ हजार ७८४ मतांनी पराभव केला आहे.
या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार होते तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत गीते हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. सुनील तटकरे यांना ५ लाख ८ हजार ३५२ मते मिळाली तर अनंत गीते यांना ४ लाख २५ हजार ५६८ मते मिळाली. ही निवडणूक कोण जिंकणार, याकडे या मतदार संघाचे लक्ष लागले होते. निवडणुकीत दापोली विधानसभा मतदार संघातून अनंत गीते यांना सुनील तटकरे यांच्यापेक्षा ८ हजार ४५२ मते अधिक मिळाली. गुहागर विधानसभा मतदार संघातून तब्बल २७ हजार ७९६ मते अधिक मिळाली. त्यामुळे या दोन्ही मतदार संघातून कुणबी समाज अनंत गीते यांच्या पाठीशी असल्याचे दिसून आली.
सुनील तटकरे यांच्या प्रचाराच्या सभेत दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी सुनील तटकरे यांना अनंत गीते यांच्यापेक्षा अधिक मताधिक्य देऊ, असे सांगितले होते; मात्र दापोली व गुहागर विधानसभा मतदार संघातून अनंत गीते यांनाच मताधिक्य मिळाले आहे. दापोली विधानसभा मतदार संघातून २७ फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली.
--------------
कोट
या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत गीते यांनी कुणबी समाजाला भावनिक साद घातली होती. त्यामुळे या समाजाने त्यांना मतदान केले असावे. त्यामुळे दापोली विधानसभा मतदार संघात अनंत गीते यांना मताधिक्य मिळाले आहे; मात्र विधानसभा निवडणुकीत आपण १ लाख १० हजार मतांचे मताधिक्य मिळवून विजयी होऊ, असा आपल्याला विश्वास आहे.

- आमदार योगेश कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT