कोकण

वैभववाडीत भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजीसह विजयी फेरी

CD

87968

वैभववाडीत भाजप कार्यकर्त्यांची
घोषणाबाजीसह विजयी फेरी
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ४ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या विजयाचा येथील भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करीत शहरातून विजयी फेरी काढण्यात आली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राणे हे निर्णायक आघाडी घेऊ लागल्यानंतर येथील भाजप संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. श्री. राणे विजयी होताच भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी केली. ‘नारायण राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालय ते दत्त मंदिर अशी शहरातून विजयी फेरी काढली. यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, सुधीर नकाशे, उत्तम सुतार, बाबा कोकाटे, राजू पवार, सुनील रावराणे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaccine QR Code: मोठा निर्णय! आता स्कॅन करा आणि औषधाची माहिती मिळवा; सरकारने औषध पॅकेजिंगचे नियम बदलले

Traffic Challan Rules: वाहनचालकांसाठी मोठा झटका! लोकअदालतीत जाण्यापूर्वी 50% दंड भरणे अनिवार्य; जाणून घ्या नवे नियम

Mangalwedha Sowing Delayed : मंगळवेढ्यात 35 हजार हेक्टरवर पेरणी रखडली दुष्काळाची गडद छाया

UP Jobs : २ लाख STEM ग्रॅज्युएट्सना मिळणार ग्लोबल संधी! १५ कंपन्यांचे मोठे करार, हजारो कोटींची गुंतवणूक आणि लाखो नोकऱ्यांची शक्यता

Fish Farming : मच्छीमारीतून कोट्यवधींची कमाई! सरकारचा ९ हजार कोटींचा मोठा प्लॅन, जाणून घ्या संपूर्ण योजना

SCROLL FOR NEXT