कोकण

-शृंगारतळी बंपर चोरीतील चोरटे झारखंडमधील

CD

बंपर चोरीतील संशयित झारखंडमधील

शृंगारतळी मोबाईल शॉपीत डल्ला ; एक जण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ५ : तालुक्यातील शृंगारतळी येथील मोबाईल शॉपीमधील २७ लाखांच्या बंपर चोरीमधील चोरटे झारखंडमधील असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. गुहागर पोलिसांनी गेले २० दिवस केलेल्या तपासामध्ये चोरट्यांचा पत्ता मिळवला; मात्र चोरटे हाती लागले नाहीत; परंतु त्यांना सहकार्य करणारा व त्यामध्ये सहभागी असलेला संशयिताच्या भावाला गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी दिली.
तालुक्यातील शृंगारतळीमधील गोविंदा मोबाईल शॉपीमधील २७ लाखाचे मोबाईल व ९० हजाराची रोकड चोरी गुहागर पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. दुकानातील सीसीटीव्ही फूटेजबरोबर एका हार्डवेअरमधील सीसीटीव्ही फूटेजमध्ये साहित्य घेतानाच फूटेज मिळून आले. त्यानंतर एसटी बसस्थानक, रेल्वेस्टेशन आदी भागातही त्यांचे सीसीटीव्ही फूटेज प्राप्त झाले असून अखेर आरोपी नक्की कोण, याचा शोध लावण्यात त्यांना यश आले आहे. या तपासामध्ये झारखंड येथे पोहचून त्या चोरांचे घर गाठले; मात्र या चोरीमध्ये सहभागी असल्याचा संशय धरून त्याच्या भावाला ताब्यात घेतले आहे. कमी पगारामध्ये नोकरदार मिळवून त्याची संपूर्ण माहिती न घेता अनेक ठिकाणी कामगार ठेवले जात आहेत. यामुळे असे संशयित गुन्हेगार चोरीचे कृत्य करत आले आहेत. या प्रकरणी गुहागर पोलिसांचा सखोल तपास सुरू असून लवकरच उर्वरित चोरटे हाती लागतील, असा विश्वास राजमाने यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सून अर्ध्या महाराष्ट्रातून माघारी; ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला, मुंबईसह ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Sharad Pawar: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची शरद पवारांनी घेतली दखल; ‘सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधावा’

करकायदा : ‘आयटीसी’बाबत सुधारणा...

आजचे राशिभविष्य - ०५ ऑक्टोबर २०२६

शेअर बाजार : रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज (गुरुवारचा बंद भाव : रु. ८४१)

SCROLL FOR NEXT