कोकण

चिपळुणात पावसाने दिलासा

CD

-ratchl४३.jpg ः
२४M८७९५८
चिपळूण ः शहरात सायंकाळी पावसाने लावलेली हजेरी.
---------------

चिपळुणात पावसाने दिलासा

चिपळूण, ता. ४ ः गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा लागून असलेल्या मान्सूनने मंगळवारी आपली चाहूल दिली. दोन दिवसापांसून तालुक्यात अनेक ठिकाणी पेरणीची कामे सुरू झाली आहेत. त्यातच मान्सून दाखल झाल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे.
यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच कडकडीत ऊन आणि प्रचंड उन्हाळा जाणवत होता. त्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. उन्हाच्या कडाक्यानंतर मे महिन्याच्या मध्यावर अवकाळी पावसाने अवघा परिसर झोडपून काढला. सलग सहा दिवस येथे वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसात चिपळूण तालुक्यात घरांचे व गोठ्यांचे सुमारे दोन कोटींहून अधिक नुकसान झाले. त्यामध्ये महावितरणचे ७८ लाखांचे नुकसान झाले; मात्र या अवकाळी पावसानंतर पुन्हा कडाक्याचा उन्हाळा जाणवला. गर्मीने सारेचजण हैराण झाले होते. अशातच मंगळवारी सायंकाळी ५.३० वा. अचानक पावसाचे वातावरण तयार झाले आणि काही वेळातच पावसाला सुरवात झाली. त्यानंतर तासभर पावसाची रिपरिप सुरूच होती. या पावसामुळे व्यापारीवर्गाची तारांबळ उडाली; मात्र शेतकरीवर्ग पेरणीच्या कामांमुळे सुखावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: 'एक मिनिटही वाया घालवू नका, गेल्यावर्षी जिंकलो त्यामुळे...' विराट कोहलीचा RCB च्या खेळाडूंना सल्ला

Plant Care in Summer: कडक उन्हात बाग वाचवायची कशी? जाणून घ्या सोपे उपाय!; उन्हाळ्यात झाडांची ‘तहान’ भागवा

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

लग्नाला बोलावलं नाही म्हणून रुसलेली चाहती, रश्मिका-विजयने घरी बोलावून केला तिच्या आवडीचा 'खास' बेत, Viral Video

Dharashiv News: अवकाळी पाऊस-गारपीटीचा फटका; द्राक्ष, कलिंगड दर कोसळले; १६० रुपयांवरून ७० रुपयांवर द्राक्ष; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

SCROLL FOR NEXT