कोकण

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या विजयाचा शिल्पकार

CD

88005


सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या
विजयाचा शिल्पकार

प्रभाकर सावंत ः घटक पक्षांचे सहकार्य

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ४ ः जिल्हावासीयांनी भाजपच्या बाजूने भरघोस मतदान दिले असून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरील जिल्हावासीय जनतेचे असलेले प्रेम दिसून आले. भाजप पक्षाच्या स्थापनेपासून मी बारावा अध्यक्ष असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपच्या कमळ चिन्हावर भाजपचे खासदार निवडून आले आहेत. भाजपच्या विजयाचा हा कळस असून महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या सहकार्यामुळे हा विजय सोपा झाला, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर पहिल्यांदाच भाजपचे खासदार म्हणून प्रथमच या मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यात यश आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या मागील ११ अध्यक्षांनी संघटनात्मक बांधणी चांगल्या पद्धतीने केली होती. या निवडणुकीत भाजपचे खासदार विजयी झाल्यामुळे जिल्हाध्यक्षपदावर मिळालेली संधी व या निवडणुकीतील यश तसेच विजयाचा आनंदोत्सव फार मोठा आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी मेहनत केली. शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, मनसे, आरपीआय आठवले गट या सर्व महायुतीतील घटक पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी चांगले सहकार्य केले. त्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. कणकवली, सावंतवाडी व कुडाळ या विधानसभा मतदारसंघांतील मिळालेले मोठे मताधिक्य राणे यांच्या विजयाचा शिल्पकार ठरले. राणे यांच्यावरील तसेच पालकमंत्री चव्हाण यांनी केलेल्या कामामुळे व भाजपच्या संघटनात्मक ताकदीमुळे जिल्हावासीयांनी भाजपच्या बाजूने चांगला कौल दिला. त्याबद्दल आनंद आहे. अध्यक्षपदावरील हा भाजपचा विजय नेहमी स्मरणात राहील. भाजपच्या माध्यमातून चांगले काम या जिल्ह्यात करू.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT