कोकण

कसई-धाटवाडी येथे दारू अड्ड्यावर छापा

CD

कसई-धाटवाडी येथे
दारू अड्ड्यावर छापा

दोडामार्ग पोलिसांत दोघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ५ ः कसई-धाटवाडी येथे अवैध दारू अड्ड्यावर येथील पोलिसांनी सोमवारी (ता. ३) रात्री सव्वा दहाच्या सुमारास छापा टाकला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. जानू पदू कोळेकर (वय ५८) व संतोष रामचंद्र वडर (वय २९, दोघेही रा. कसई-धाटवाडी) अशी संशयितांची नावे असून त्यांच्याकडून १० हजार पन्नास रुपयांच्या अवैध दारुसह २३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
येथील पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यांवरील कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. सोमवारी सायंकाळी साटेली-भेडशी येथील आवाडे येथे दोन दारू अड्ड्यांवर स्थानिक पोलिस व एलसीबीने संयुक्तरीत्या कारवाई केली. कसई-धाटवाडी येथे रात्री १० वाजण्याच्या सुमारास अजून एक कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी कसई धाटवाडी येथे अवैध दारू अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी नऊ बिअरचे टीन, व्हिस्कीच्या एकूण ५७ बाटल्या अशी एकूण १० हजार पन्नास रुपयांचा गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यासह १३ हजार ७०० रुपये रोख रक्कम हस्तगत केली. या प्रकरणी संशयित जानू कोळेकर व संतोष वडर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी, उपनिरीक्षक आशिष भगत, सहाय्यक फौजदार गवस, हवालदार सावंत, कॉन्स्टेबल वेंगुर्लेकर, चालक कांबळे यांनी कारवाई केली. पोलिस हवालदार गवस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डोळ्यांसमोर मुलगा तडफडत होता… लॉक झालेल्या कारमध्ये ३ वर्षांचा चिराग जिवंत जळाला; लग्नाच्या ८ वर्षांनी झालेला मुलगा काळाने हिरावला

Solapur Crime: वडिलाकडून मुलाचा निर्घृण खून; जुन्या रागातून कृत्य, माढा तालुक्यातील घटना, लोखंडी मेकने डोक्यावर वार!

Nagpur crime : दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या प्रियकराला व्हिडिओ कॉल, नंतर २३ वर्षीय विद्यार्थिनीने जे केलं ते धक्कादायक...

'सगळ्या गोष्टींचा मनस्ताप होतोय' मलायका आरोरा नेटकऱ्यांवर संतापली, म्हणाली...'आता हे माझ्यासाठी त्रासदायक...'

Pune Crime: ट्रेडिंग अन् टास्कच्या आमिषाने फसवणूक; पुण्यातील चौघांना तब्बल ६७ लाखांचा गंडा, पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल!

SCROLL FOR NEXT