कोकण

कशेडी बोगद्यातील अव‍जड वाहतुकीला अखेर ''ब्रेक

CD

88156

कशेडीत अव‍जड वाहतुकीला अखेर ''ब्रेक''
राष्ट्रीय महामार्ग विभागाने उभारले हाईट खांब; बोगद्यात फक्त हलक्या वाहनानांच प्रवेश
खेड, ता. ५ : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यातून होणाऱ्या अवजड वाहनांकरिता दुतर्फा वाहतुकीच्या वाहनांमुळे अन्य वाहनचालकांचा गोंधळ उडत होता. या अवजड वाहतुकीच्या वाहनांना ''ब्रेक'' लावण्यासाठी अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुन्हा मजबूत हाईट खांब उभारले. यामुळे अवजड वाहतुकीला अखेर ब्रेक लागला आहे.
कशेडी बोगदा महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर केवळ हलक्या वाहतुकीसाठी खुला झाला होता; मात्र बोगद्यातून अवजड वाहनांची दुतर्फा वाहतूकही सुरू होती. यामुळे अन्य वाहनचालकांचा गोंधळ उडून वादाचे प्रसंग घडत होते. अवजड वाहतूक नियंत्रित करताना कशेडीतील महामार्ग वाहतूक पोलिसांची कसरत सुरू होती. यामुळे बोगद्यातील अवजड वाहतुकीला ''ब्रेक'' लावण्यासाठी हाईट खांबचा अवलंब करण्यात आला; मात्र हे हाईट खांब अवजड वाहतुकीच्या वाहनचालकांनी अवघ्या दोन दिवसातच उखडले. अखेर राष्ट्रीय महामार्ग खात्याने आणखी मजबूत हाईट खांबची उभारणी करण्याचा निर्णय घेत प्रत्यक्षात कार्यवाही सुरू केली. तालुक्यातील खवटी येथील अनुसया हॉटेलनजीक व पोलादपूर हद्दीतील भोगाव येथे मजबूत हाईट खांब उभारले आहेत. याशिवाय दोन्ही बाजूला अवजड बॅरिकेट्सही लावले आहेत. यामुळे कशेडी बोगद्यातून दुतर्फा अवजड वाहतूक रोखण्यात राष्ट्रीय महामार्ग खात्याला यश आले आहे. कशेडी बोगद्यातून दुतर्फा हलक्या वाहतुकीसाठी केवळ हलक्या वजनाच्या वाहनांनाच मुभा देण्यात आली आहे.

कोट
छोटी वाहने बोगद्यातून दोन्ही बाजूंनी येताना आजपर्यंत अनेक अपघात झाले. लवकरात लवकर राष्ट्रीय बांधकाम विभागाने दुसरा बोगदा सुरू करावा ही आमची गेल्या अनेक दिवसापासून ची मागणी आहे. अवजड वाहतूक बंद करणे आवश्यकच होते.
- संदीप शिरावले, वाहनचालक, खेड

चौकट
वाहतूक कोंडीमुळे वादाचे प्रसंग
बोगद्यातून अवजड वाहनांची दुतर्फा वाहतूकही सुरू होती. यामुळे अन्य वाहनचालकांचा गोंधळ उडून वादाचे प्रसंग देखील घडत होते. त्याच बरोबर अनियंत्रित वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. सुदैवाने अपघात घडलेला नाही. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी अवजड वाहतूक बंदची मागणी होत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT