कोकण

चिपळुणातील शंकरवाडीत फुलली फुलांची बाग

CD

88188

चिपळुणातील शंकरवाडीत फुलली फुलांची बाग
जागतिक पर्यावरणदिन; वृक्ष लागवडीसाठी देणार मोफत रोपे
चिपळूण, ता. ५ः शहरातील शंकरवाडी येथे रंगबेरंगी फुलांची बाग तयार करत चिपळूण पालिका प्रशासनाने बुधवारी जागतिक पर्यावरणदिन साजरा केला. पर्यावरण संवर्धनासाठी ‌‘वेडं‌’ होऊन काम करायला हवं, असे मत मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी मांडले.
मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या संकल्पनेतून शंकरवाडी येथे हा उपक्रम राबवण्यात आला. पालिकेच्या जागेमध्ये नजरेला भुरळ घालणाऱ्या फूलझाडांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाला शंकरवाडी येथील नागरिकांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे नियोजन प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे, उद्यान विभागप्रमुख प्रसाद उर्फ बापू साडविलकर यांनी केले. सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे भाऊ काटदरे, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, उद्योजक रामशेठ रेडीज, माजी नगरसेविका आदिती देशपांडे, माजी नगरसेविका शिवानी पवार आदी उपस्थित होते. शहरातील विविध भागांमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान, उद्यान आणि फुलांच्या बागा जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली. फुलांची बाग उपक्रम राबवल्याबद्दल शंकरवाडी नवीन वसाहत येथील ग्रामस्थांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले.
शहरातील खासगी निवासी इमारती संकूल/बंगलो, खासगी मोकळ्या जागा येथे ज्या मालकांना आपल्या जागेमध्ये वृक्ष लागवड करण्याची इच्छा आहे त्यांनी पालिकेमार्फत विनामोबदला वृक्षरोपांचे वाटप केले जाणार आहे. हे वृक्ष पालिका हद्दीमध्येच लावण्याची अट आहे. वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन हे मालकांनी करावयाचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या जमीनमालकांनी १५ जूनपर्यंत आपली मागणी नगरपालिकेचे उद्यान विभागप्रमुख प्रसाद उर्फ बापू साडविलकर यांच्याकडे कार्यालयीन वेळेत करावीत, असे आवाहन केले आहे.

चौकट
नागरिकांना तांब्या-पेल्यामधून पाणी
जागतिक पर्यावरणदिनापासून चिपळूण पालिका कार्यालायामध्ये सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी प्लास्टिक पाणीबॉटलचा वापर न करण्याचा निर्धार केला आहे तसेच येणाऱ्या नागरिकांना तांब्या-पेल्यामध्ये किंवा ग्लासमधून पाणी देण्यास सुरवात केली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी तशा सूचना मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT