कोकण

अतिक्रमण काढण्यासाठी व्यापाऱ्यांना एक दिवसाची मुदत

CD

88193

अतिक्रमण काढण्यासाठी एक दिवसाची मुदत
चिपळुण पालिका करणार कारवाई; शहरात अधिकाऱ्यांकडून पाहणी
चिपळूण, ता. ५ः चिपळूण पालिकेने बाजारपेठेतील गटारांवरील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी आज व्यापाऱ्यांना अतिक्रमण काढण्याची सूचना केली. गुरूवारी गटारांवर अतिक्रमण दिसले तर पालिका जप्त करेल, असा इशारा त्यांना देण्यात आला. गटारांवरील कडप्पे, बांधकामे काढण्याची सूचना केली आहे.
चिपळूण पालिकेकडून मान्सूनपूर्व कामांची लगबग सुरू आहे. शहरातील नाले, पऱ्हे, गटारांची साफसफाई केली जात आहे. शहरातील बाजारपेठेत रस्त्याला लागून गटार आहेत. दुकानदार, व्यावसायिकांनी या गटारांवर कडप्पे, लेंटर तर काही ठिकाणी बांधकामे करून ती गटारे झाकली आहेत. त्यामुळे पालिकेतील सफाई कामगारांना या गटारांची साफसफाई करताना अडचणी निर्माण होत होत्या. गटारात प्लास्टिक बॉटल्स, मातीसह अन्य कचरा अडकल्यानंतर ते स्वच्छ करता येत नाही. पावसाळ्यात गटारातील पाणी रस्त्यावर व दुकानांमध्ये शिरण्याची शक्यता जास्त आहे. तुंबलेल्या गटारामुळे डासांचे प्रमाण वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. या गटारांची तातडीने साफसफाई करावी, अशी मागणी व्यापारी केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक महेश जाधव यांनी आज शहरात फेरफटका मारला आणि गटारांवरील कडप्पे यांच्यासह कच्ची व पक्की बांधकामेही तोडण्याची सूचना व्यापाऱ्यांना केला. गुरूवारी सकाळी अतिक्रमण दिसले तर पालिका ते जप्त करेल, असा इशारा देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT