Crime News sakal
कोकण

Crime News: खेडमध्ये तरुणाला २४ लाखाचा ऑनलाईन गंडा

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली |

CD

Khed News: शहरातील एकविरा नगर येथे वास्तव्यास असलेल्या तरुणाची तब्बल २४ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेअरमार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक न करता कंपनीत जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली.

त्यानुसार सोमवारी सायंकाळी उशिरा अज्ञातावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विक्रांत विजय दांडेकर (४०, रा. एकविरा नगर, खेड) यांनी येथील तक्रार दाखल केली आहे. ही घटना १९ एप्रिल ते २४ मे या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

तो फेसबुक अकाउंट चालवत असताना शेअरमार्केट ट्रेडिंगची लिंक दिसली. त्या लिंकवर त्याने क्लिक केले असता व्हॉटस् अॅप ग्रुपवर जॉईंट होण्यास सांगितले. त्यानंतर ज्यादा परतावा मिळण्याच्या आमिषाला बळी पडत रक्कम भरण्यास टप्प्याटप्प्याने सांगून तब्बल २४ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: मेट्रो-५ प्रकल्पाला अखेर गती! भोईरवाडी-उल्हासनगरसाठी एमएमआरडीएच्या निविदा

IND vs SL 1st Test: शुभमन गिलला चेंडू लागला, उपचार घेण्यासाठी धावला! भारताच्या सराव सत्रात आज बरंच काही घडलं, वाचा...

पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकरांनी माधुरीची घेतली फिरकी, म्हणालेले... 'तुला खुप मिळाले पण...'

Post Recruitment 2026: भारतीय टपाल विभागात नोकरीची संधी! महिन्याला ६३ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Marathi News Live Updates : 'सुभाष देसाई' प्रकरणात या न्यायालयाने अपात्रतेचा प्रश्न हाताळला नव्हता - न्यायमूर्ती

SCROLL FOR NEXT