कोकण

चिपळूण ः पाण्याच्या निचऱ्यासाठी तात्पुरत्या गटारांची खोदाई

CD

88150
--------------

पाण्याच्या निचऱ्यासाठी गटारांची खोदाई
शंकरवाडीतील रस्ता १२ मीटरचा; ग्रामस्थांची काढली समजूत
चिपळूण, ता. ५ः शहरातील शंकरवाडी रस्ता विकास आराखड्यानुसार १२ मीटरचा होणार आहे. पावसाळ्यानंतर रस्ता व गटार कामांना वेगाने सुरवात होणार आहे; मात्र यावर्षी पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी तात्पुरत्या गटारांची खोदाई सोमवारपासून केली जात आहे. तसेच रस्त्याची आखणीही करण्यात आली आहे. कामाला विरोध करणाऱ्या काही नागरिकांची नगरपालिका अधिकाऱ्यांनी समजूत काढली.
शहरविकास आराखड्यात रामेश्वर मंदिर ते धामणस्कर चौक हा शंकरवाडीतील रस्ता १२ मीटरचा असून, दोन्ही बाजूला गटारे आहेत; मात्र सध्या प्रत्यक्षात हा रस्ता फार कमी रूंदीचा असून त्याला अतिक्रमणाने वेढले होते. त्यामुळे या भागाचा दिवसेंदिवस वाढणारा विस्तार व २०२१ ला आलेल्या महापुरानंतर मदतकार्य करताना आलेल्या अडचणी लक्षात घेता १२ मीटरचा रस्ता करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. त्यामुळे नगरपालिकेने हा रस्ता १२ मीटरचा करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी त्यावरील अतिक्रमणे हटवली. त्यामुळे सोमवारी १२ मीटर रस्ता व दोन्ही बाजूच्या गटारांची आखणी करण्यात आली असून यावर्षी तात्पुरती गटारे केली जाणार आहेत; मात्र कामाला सुरवात होताच काही नागरिकांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला; मात्र कार्यालय अधीक्षक अनंत मोरे, रचना सहाय्यक नम्रता खैर-मोरे यांनी त्यांची समजूत काढली. त्यामुळे पुढील काम करणे सोपे झाले. बांधकाम विभागाचे विनायक सावंत यांनी येथे २ जेसीबी, तीन डंपर व १४ कामगार लावले असून ते हे काम करीत आहेत. पावसाळा संपताच रस्ता व गटारांची कामे केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik TCS Case: नशिला 'शीर खुर्मा' ते फेस स्कॅन... नाशिक धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासे

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २५ एप्रिल २०२६ ते १ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

Mohol News : शेत मालकीनीनेच केला दरोड्याचा बनाव; पोलिसांच्या चौकशीत सत्य उघड, मोहोळ तालुक्यातील प्रकार

Chardham Yatra 2026 : केदारनाथला जायचंय? फक्त ७२ मिनिटांत ३१ हजार तिकीटं बुक; बुकिंगमध्ये महाराष्ट्र अव्वल, युपी दुसऱ्या क्रमांकावर!

Marathi Mandatory: ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी शिकवणार; पण जबरदस्ती करणार नाही, भाषा नियमावर देवेंद्र फडणविसांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT