कोकण

घरबांधणी कामासाठी माजी सैनिकास मदत

CD

घरबांधणी कामासाठी
माजी सैनिकास मदत

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ५ ः जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिक संतोष लक्ष्मण गावडे (रा. आंबोली, ता. सावंतवाडी) यांना सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या वतीने घरबांधणीकरिता ५० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर व लिपिक अनिल नाटलेकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील पात्र शहिदांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक, त्यांची अनाथ पाल्ये व अवलं‍बित यांनी अशा प्रकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुकटे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closed: 31 मार्चला शेअर बाजार बंद? ट्रेडिंग होणार की नाही? गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी

होर्मुझ उघडा नाहीतर खार्ग उडवू, तेल विहिरी पेटवू! ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, इराणचं पिण्याचं पाणीही धोक्यात?

यंदाची हनुमान जयंती 'या' राशींना फळणार ! 1 एप्रिलपासून नशीब बदलणार; पैसाच पैसा आणि भरपूर यश

Akola Civic Row: ‘पन्नास खोके’ घोषणांवरून अकोला महापालिकेत गोंधळ; महापौरांचा १६ विरोधी नगरसेवकांना तीन सभांसाठी निलंबनाचा निर्णय

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांवरून वाद चिघळला, रहिवासी आणि प्राणीमित्रांतील वाद विकोपाला; विरोधी गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT