कोकण

जिल्हा रुग्णालयातील विश्रामगृहा पडणार अपुरे

CD

जिल्हा रुग्णालयातील विश्रामगृहाची
आमदार राजन साळवींकडू पहाणी

पालकमंत्री सामंताकडे करणार ३ कोटींच्या निधीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः जिल्हा रुग्णालयात आमदार डॉ. राजन साळवी यांच्या विशेष प्रयत्नांनी उभारलेल्या विश्रामगृहाची साळवी यानी जाऊन पाहणी करून योग्य सूचना दिल्या. इमारतीची पाहणी करत असताना इमारत ही येणाऱ्या नातेवाईकांना अपुरी पडणार असल्याचे लक्षात आले. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकीत पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री सामंत ह्यांच्याकडे सुमारे ३ कोटींची आग्रही मागणी करून तो निधी मंजूर करून घेणार आहेत, अशी माहिती साळवी यांनी दिली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांच्या मागणी आता पूर्णत्वास जात असून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा नातेवाईकांची होणारी परवडत संपणार आले. यापूर्वी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या धर्मशाळेत रुग्णांचे नातेवाईक राहत असत कालांतराने ती इमारत नादुरुस्त झाल्यामुळे नातेवाईकांची उन्हाळा-पावसाळ्यात खूप हाल होत होते. सदरची बाब शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ताबडतोब जिल्हा नियोजन बैठकीच्या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली व तात्काळ जिल्हा नियोजनात निधीतून १ कोटी मंजूर करून घेतली. त्यानंतर तातडीने सर्व शासकीय मंजुरी घेऊन विश्रामगृहाची इमारत आता आकार घेत असून लवकरच काही दिवसात ती इमारत रुग्णांच्या नातेवाईकांना खुली करण्यात येणार आहे. काल आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर जगताप अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक विकास कुमरे, अंकुश शिरसाठ, सचिन वंडकर, मदन टिंगरे, उद्योजक दीपक साळवी यांच्या समवेत पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Nagpur Ganesh Visarjan: ड्रोनमधून ठेवणार गणेश विसर्जनावर नजर;६, हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त; १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT