कोकण

कुसूरमध्ये शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागुन हानी

CD

88278

कुसूरमध्ये शॉर्टसर्किटमुळे
घराला आग लागुन हानी

लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ५ ः कुसूर खालची बौद्धवाडी येथील सुनीता नारायण कांबळे यांच्या घराला शॉटसर्किटमुळे आग लागली. हा घटना काल (ता.४) मध्यरात्री घडली. या आगीत सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने इतर कोणतीही हानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की ः कुसूर खालची बौद्धवाडी येथे सुनीता कांबळे यांचे घर आहे. या घरात त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पाच माणसे राहतात. काल रात्री जेवण ओटपल्यानंतर हे कुटुंब झोपी गेले. दरम्यान, मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घराच्या काही भागाला शॉटसर्किटमुळे अचानक आग लागली. मात्र, गाढ झोपेत असलेल्या कांबळे कुटुंबियांनी आग लागल्याचे प्रथम समजले नाही. या आगीमुळे घराच्या शेजारी असलेल्या शेळ्यांच्या गोठ्यातून शेळ्या मोठ मोठ्याने ओरडू लागल्या. या आवाजाने कांबळे कुटुंबातील सदस्यांना जाग आली. त्यानंतर त्यांना घराला आग लागल्याचे समजले. घरातील लोकांनी बाहेर येऊन आरडाओरडा केल्यानंतर वाडीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी गोठ्यातील शेळ्यांना बाहेर काढले. तसेच शर्थीच्या प्रयत्नाने आग अटोक्यात आणली. या आगीत घराचा काही भाग जळाला. या घटनेची माहिती मिळताच तलाठी गणपत शिंदे यांनी आज घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकला चलो रे! काँग्रेसची बंगालमध्ये २९४ पैकी २८४ जागांवर उमेदवारांची घोषणा, यादी आली समोर

इराणवर अण्वस्त्र हल्ला झाल्यास भारतावर परिणाम होईल का? कोणत्या देशांना सर्वाधिक धोका?

Baramati SDM Transfer: बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची बदली; मिरजचे उत्तम दिघे तात्काळ कार्यभार स्वीकारणार

Raigad Pali Road Hazard: पालीतील हटाळेश्वर चौकात प्रचंड खड्डा; भाविक-स्थानिकांचा नगरपंचायतीवर संताप, अपघातांचा धोका वाढला

Gautala Ghat accident news: गौताळा घाटात ऊसतोड मजुरांचा टेम्पो दरीत कोसळला; १३ जखमी, ७ जणांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT