कोकण

आरवली येथील नव्या पुलावरून वाहतूक सुरू

CD

- rat६p९.jpg -
२४M८८३३३
चिपळूण ः आरवली येथील गडनदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
.............

आरवलीतील नव्या पुलावरून वाहतूक सुरू

प्रवाशांमधून समाधान ; पावसाळ्यापूर्वी प्रश्न सुटला

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ : मुंबई-गोवा महामार्गावर आरवली येथील गडनदीवरील नव्या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. पावसाळ्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला केल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त केला जात आहे.
मागील अनेक दिवसांपासून या पुलाचे काम सुरू होते. या दरम्यान जुन्या पुलावरून वाहतूक सुरू होती; मात्र पुलाचे काम सुरू असताना वाहनचालकांना फार त्रास सहन करावा लागत होता. पुलाच्या रस्त्यासाठी दोन्ही बाजूने खोदाई करण्यात आली होती. खोदलेल्या भागातील माती वाऱ्याबरोबर उडून जात असल्यामुळे धुळीचा वाहनचालकांना त्रास होत होता. उन्हाळ्यात या समस्येला वाहनचालकांना सामोरे जावे लागले. गडनदीवर पुलासाठी नदीत सहा पिलर उभारण्यात आले होते. पिलर उभारल्यानंतर पुलाचे काम दोन वर्ष सुरू झाले नाही. त्यामुळे नदीत उभारलेले पिलर केवळ शोभेचे बाहुले म्हणून उभे होते. सहा महिन्यापूर्वी पिलरवर बांधकाम करून नंतर काँक्रिट टाकण्यात आले. त्यानंतर दोन्ही बाजूचा जोडरस्ता तयार करण्यात आला. पावसाळ्यापूर्वी या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणारी वाहने या पुलावरून जातात. रत्नागिरीहून चिपळूणकडे जाणारी वाहने मात्र अजूनही जुन्या पुलावरून मार्गस्थ होत आहेत. पावसाळ्यापूर्वी पुलावरून वाहतूक सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT Fina IPL 2026: RCB vs GT आयपीएल 2026 फायनलमध्ये महामुकाबला; बंगळूर की गुजरातची? डबल बारी कोणाची?

Hasan Mushrif vs Shivaji Patil : 'शिवाजीराव मुक्त गोकुळ त्यांना करायचे का?' महायुतीच्या गोकुळमधील पॅनेलवर आमदार शिवाजी पाटलांनी केले वक्तव्य

Latest Marathi News Live Update : क्रीडा, आरोग्य आणि सुदृढतेबाबत शिक्षण दिले, तर त्याचा खूप मोठा फरक पडेल- अभिनेता सुनील शेट्टी

Pune Crime: 'माझा गुन्हा का दाखल केला नाही?' संतापलेल्या महिलेचा पोलिस चौकीत धिंगाणा, वैद्यकीय अहवालात मोठा खुलासा

Mumbai : पावसाने रस्ते निसरडे झाले, अपघातामुळे वाहनांच्या रांगा; तर ओव्हर हेड वायर तुटून मध्य रेल्वेचाही खोळंबा

SCROLL FOR NEXT