कोकण

ही तर बदलाची सुरुवात

CD

88351

ही तर बदलाची सुरुवात
अर्चना घारेः महाविकास आघाडीच्या यशावर प्रतिक्रिया
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ः महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील यश ही बदलाची सुरुवात आहे. महाविकास आघाडीचा विजय आमच्या कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे, उत्साह वाढविणारा आहे, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे यांनी व्यक्त केले.
लोकशाहीमध्ये निवडणुकीत जय-पराजय होतच असतो, यात नाराज होऊन संयम सोडायचा नसतो, असे सांगत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये विनायक राऊत यांच्या पाठिशी राहिलेल्या सर्व मतदार, महाविकास आघाडी व सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी, महिला यांचे सौ. घारे यांनी आभार व्यक्त केले. तसेच विजयी उमेदवार खासदार नारायण राणे यांचे देखील अभिनंदन केले.
सौ. घारे यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले, त्यात असे म्हटले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आपल्याला अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. कुठलेही अपयश अंतिम नसते. अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने, उमेदीने सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडे दिग्गज नेते होते. मागील विधानसभा निवडणुकीतील पहिल्या दोन क्रमांकाचे मतदान घेणारे उमेदवार होते. मागील विधानसभेतील दोन्ही उमेदवारांच्या मतांची बेरीज जवळपास सव्वा लाख होत असताना फक्त ८५ हजार मते महायुतीला घेता आली.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी श्री. राऊत यांना चांगली साथ दिली‌. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या निकालाचे विश्लेषण केले जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील, अशी भावना सौ. घारे परब यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tipu Sultan Heirs : टिपू सुलतानचे वंशज चक्क चालवतात रिक्षा, सोन्या चांदीत लोळणारे राजघराणे एक-एक रुपयाला झालेत लाचार, आता कुठे आहेत

Kankavli Firing Case : कणकवलीत गोळ्या झाडून बांधकाम व्यावसायिकाचा खून, अवघ्या २१ वर्षीय तरूणाने केला खून; खुनाचे नेमकं कारण काय?

Latest Marathi News Live Update : मद्यधुंद तरुणांकडून दुचाकींची तोडफोड,घटना सीसीटीव्हीत कैद

Crude Oil: तेलाचा दर 2022 इतकाच… तरी भारतासाठी 24% महाग का? आणि दर कमी झाले तरी पेट्रोल का स्वस्त होत नाही?

Shivaji Maharaj Navy : होर्मुज पार करायची शिवरायांची जहाजे! चक्क 'या' देशात पोहचलं होतं मराठा आरमार! ३ मोठ्या ऐतिहासिक नोंदी समोर

SCROLL FOR NEXT