कोकण

आवाडेत १४ हजारांचा अवैध दारुसाठा जप्त

CD

आवाडेत १४ हजारांचा
अवैध दारुसाठा जप्त
दोडामार्गः या आठवड्यात दुसऱ्यांदा आवाडे येथे अवैध दारू अड्ड्यावर छापा टाकून १४ हजार ४०० रुपये किंमतीचा अवैध दारुसाठा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी डेव्हिड आलेक्स फर्नांडिस (वय ५८, रा. आवाडे) या संशयितावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोडामार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईने राजरोसपणे अवैध दारू विक्री करणाऱ्या दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. मागील काही दिवसांपासून साटेली-भेडशी, आवाडे येथे अवैध राजरोसपणे विकल्या जाणाऱ्या दारुबाबत मोठी चर्चा झाली होती. या अड्ड्यावर कारवाई व्हावी, असा सूर नागरिकांमधून व्यक्त होता. याची थेट दखल या आठवड्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घेत दोघांवर छापा टाकून कारवाई केली होती. या कारवाईनंतर पुन्हा एकदा दोडामार्ग पोलिसांकडून आवाडे येथे कारवाई करण्यात आली. या ठिकाणी १४ हजार ४०० रुपये किंमतीचा अवैध दारुसाठा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलिस हेड कॉ. वसंत देसाई, सुतार, गवस यांनी केली.
-------------
गवाणकर कॉलेजचा
९२ टक्के निकाल
सावंतवाडीः लोकमान्य ट्रस्ट संचलित येथील देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयाचा तृतीय वर्षाचा ''बीएमएस''चा (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) निकाल ९२ टक्के लागला. महाविद्यालयातून प्रथम क्रमांक शारदा नाईक, द्वितीय लज्जिता भालेकर, तृतीय क्रमांक स्वराली पेडणेकर यांनी मिळविला. शारदा नाईक हिला एकूण ५३८ गुणांसह ''ओ ग्रेड'' मिळाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, सचिव पंढरी परब, संचालक सई ठाकूर-बिजलानी, संचालक सचिन मांजरेकर, लोकमान्य एज्युकेशनचे को-ऑर्डिनेटर मिसाळे, सीनियर एक्झिक्युटिव्ह प्रवीण प्रभूकेळुसकर, कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशासाठी प्रा. आनंद नाईक, अस्मिता गवस, साईप्रसाद पंडित, शैलेश गावडे, मेथा मयेकर, एल. पी. पाटील या सर्वांनी परिश्रम घेतले.
-------------
अहिल्यादेवी होळकरांना
कुडाळ येथे अभिवादन
कुडाळः अहिल्या ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्यावतीने श्रीमती अहिल्याबाई होळकर जयंती नुकतीच कुडाळ येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा उषा आठल्ये, सदस्य सुधाकर जोशी, मीनाश्री नार्वेकर, सुप्रिया मेहता, संस्थेच्या कार्यवाह कल्पिता साटेलकर उपस्थित होत्या.
-------------
सावंतवाडीत २१ ला
अभंग गायन स्पर्धा
सावंतवाडीः राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्ग व श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने अभंग गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा अठरा वर्षांखालील मुला-मुलींसाठी असून, २१ जूनला सायंकाळी ४.३० वाजता उभाबाजार, सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात होणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम १५०० रुपये, द्वितीय १००० रुपये, तृतीय ७०० रुपये, उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय प्रत्येकी ५०० रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या मुला-मुलींनी आपली नाव नोंदणी मधुरा खानोलकर यांच्याकडे नोंदवावी. प्रथम नाव नोंदणी केलेल्या २० स्पर्धकांना स्पर्धेत सहभाग घेता येईल. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन राधारंग फाउंडेशन व सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT