कोकण

कोंढेतड, डोंगरतिठा डेंजर झोन

CD

-rat६p२७.jpg -
P२४M८८३४४
राजापूर : कोंढेतड गाडगीळवाडी येथे दुतर्फा वाहनांची अशी वर्दळ असते.
----------

मुंबई-गोवा महामार्गावरील कोंढेतड, डोंगरतिठा मार्ग बनला ‘डेंजर झोन’

तातडीने उपाययोजना गरजेची ; तीव्र उतारासह वळणांमुळे धोकादायक
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ ः मुंबई-गोवा महामार्गावरील कोंढेतड आणि डोंगरतिठा येथील रस्ता आधीच तीव्र उतार आणि वळणांचा आहे. या ठिकाणी मुंबईकडून गोव्याकडे आणि गोव्याकडून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणारी वाहने, त्याचवेळी कोंढेतडच्या बाजूने डोंगरतिठा येथे जाण्यासाठी डावीकडून उजवीकडे वळणारी वाहने आणि त्याचवेळी जुन्या रस्त्याने शहरामध्ये जा-ये करणारी अशा विचित्र स्थितीची भर पडली आहे. त्यामुळे येथे अपघाताला निमंत्रण मिळत असल्याने कोंढेतड आणि डोंगरतिठा येथील रस्ता प्रवासासाठी ‘डेंजर झोन’ ठरत आहे.
शहरानजीकच्या कोंढेतड येथून महामार्गावरून विविध भागामध्ये जाणारे मार्ग वा रस्ते आहेत. त्यामध्ये या भागामध्ये वाहनांसह लोकांची नेहमीच वर्दळ असते. कोळशाच्या ट्रकने दुचाकी उडवून मोटारीला दिलेल्या धडकेतून झालेल्या अपघाताने कोंढेतड गाडगीळवाडी येथील महामार्गावरील ठिकाण धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले.
कोंढेतड गाडगीळवाडी येथील परिसर वळणाचा आणि उताराचाही आहे. अर्जुना नदीवरील सर्वाधिक उंचीचाच पूल पार करून मुंबईकडून गोव्याकडे आणि गोव्याकडून मुंबईकडे भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांना येथील नागमोडी वळणांचा अंदाज येत नाही. त्याचवेळी डोंगर, विल्ये, जैतापूर आदी भागांमध्ये जाणारी वाहने मोठ्या पुलावरून रस्त्याने येत पुढे कोंढेतडच्या बाजूने डोंगरतिठा येथे जाण्यासाठी त्यांना महामार्ग पार करून डावीकडून उजवीकडे वळावे लागते तसेच या भागातील पूर्वीच्या जुन्या रस्त्याने शहरामध्ये जा-ये करणाऱ्‍या वाहनांचीही वर्दळ असते. शहराच्या दिशेने जाणाऱ्या पूर्वीच्या जुन्या रस्त्याच्या येथे कोणताही माहितीफलक वा दिशादर्शक फलक नसल्याने गोव्याकडून मुंबईकडे भरधाव जाणाऱ्‍या वाहनाला डोंगरतिठा येथे आल्यानंतर नेमके कुठल्या रस्त्याने जायचे? असा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे कोंढेतड गाडगीळवाडी आणि डोंगरतिठा डेंजर स्पॉट झाले आहेत.
----------------
कोट
कोंढेतड गाडगीळवाडी परिसरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाणारे रस्ते असल्याने त्या त्या भागात जाणाऱ्या वाहनांची वर्दळ नेहमीच जास्त असते. या भागात तीव्र उतार आणि वळण असल्याने रस्ता धोकादायक झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी दिशादर्शक फलक आणि अन्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- अमोल गुरव, वाहनचालक
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT