कोकण

भाजप तालुकाध्यक्षांच्या गावात राऊतांना आघाडी

CD

भाजप तालुकाध्यक्षांच्या गावात
विनायक राऊत यांना आघाडी

लोकसभा निवडणूक ; पोफळी पंचायत समिती गणातील चित्र

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत पोफळी पंचायत समिती गणातून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना तब्बल १ हजार ४५८ मतांचे मताधिक्य मिळाले. आकूस खाँ नगर येथील मतदान केंद्रावरून सर्वाधिक ४५१ मतांची आघाडी मिळाली. ही मते राऊत यांना पोफळी पंचायत समिती गणातून आघाडी मिळवून देण्यात महत्वाची ठरली आहेत. भाजप तालुकाध्यक्षांच्या गावातही महायुतीचे उमेदवार नारायण राणे मागे राहिले.
पोफळी पंचायत समिती गण हा नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या गणात पोफळीसह शिरगाव, कुंभार्ली, कोंडफणसवणे ही गावे येतात. या गावातील बहुतांशी ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला मते मिळवण्यासाठी या गणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहावे लागले. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ग्राऊंड लेवलवर जाऊन काम केले. मशाल हे चिन्ह घरोघरी पोहचवण्याचे काम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केले. त्यामुळे दोन्ही बाजूने निवडणूक कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठेची केली होती. आकूस खाँ नगर येथील मतदारांनी आतापर्यंत कधीच राष्ट्रवादीची साथ सोडली नाही; मात्र या वेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गावात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना हेरून त्यांची मने वळवली. त्यांना त्यांच्या मताचे मुल्य समजून सांगितले. त्यामुळे पोफळी पंचायत समिती गणातून सर्वाधिक ४५१ मतांची आघाडी विनायक राऊत यांना आकूस खाँ नगर येथून मिळाली. दुसरीकडे महायुतीच्या उमेदवाराला हक्काच्या १०० मतेही मिळवता आली नाही. भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर कुंभार्ली गावचे आहेत. त्यांना आपल्या गावातून भाजपचे उमेदवार नारायण राणे यांना मताधिक्य देता आले नाही. कुंभार्लीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मदतीने राणे यांना ३०७ मते मिळाली तर विनायक राऊत यांना तब्बल ६४४ मते मिळाली.
---------
राऊत यांना या गावात आघाडी
शिरगाव- ३१३
कुंभार्ली- ३३७
कोंडफणसवणे- ८२
पोफळी- ७२६
..................
कोट
पोफळी पंचायत समिती गणात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदारांनी चांगली साथ दिली. विधानसभा निवडणुकीतही अशी साथ मिळेल, अशी आशा आहे.

--राजा नारकर, विभागप्रमुख, पोफळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT