कोकण

क्राईम

CD

तरुणाची ११ लाखांची फसवणूक

कर्ज मिळवून देण्याचे अमिष; भामट्यावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी ः शहरानजीकच्या कुवारबाव येथील मिठाई व्यावसायिक सोशल मीडियावरील लोन मिळण्याच्या जाहिरातीला बळी पडला. यामध्ये त्यांची ११ लाख ६० हजार ६७४ रुपयांची फसवणूक झाली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ मार्च ते १७ एप्रिल २०२४ या कालावधीत कुवारबाव परिसरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, राणाराम काळुराम रायका (३८, रा. कुवारबाव, रत्नागिरी) यांनी मोबाईलवरील इन्स्टाग्राम अ‍ॅपवर लोन मिळेल, अशी जाहिरात पाहिली. त्यावरील मोबाईलवर फोन केल्यावर त्यांना अज्ञाताने लोन मिळेल असे आमिष दाखवत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर संशयिताने आपला क्युआर कोड देऊन प्रथम ५ हजार नंतर इन्शुरन्ससाठी ३८ हजार रुपये ऑनलाईन घेतले. त्यानंतर फिर्यादी राणाराम रायका यांनी वेळोवेळी ऑनलाईन ६ लाख २३ हजार ८८४ आणि आपल्या दोन मित्रांच्या बँकखाते आणि ऑनलाईनद्वारे संशयिताला ३ लाख ६३ हजार २९० असे एकूण ११ लाख ६० हजार ६७४ रुपये पाठवले. एवढे पैसे देऊनही कर्ज न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राणाराम रायका यांनी बुधवारी (ता. ५) शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

Jos Buttler: जॉस बटलरचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा फलंदाज; विराट कोहली, रोहित शर्मा टॉप ५ मध्येही नाहीत

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

SCROLL FOR NEXT