कोकण

विजेच्या समस्यांबाबत मडुरा येथे आज बैठक

CD

विजेच्या समस्यांबाबत
मडुरा येथे आज बैठक

नागरिक त्रस्त ः उपस्थित राहण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ७ ः जिल्ह्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असून महावितरणबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. गेले काही दिवस जिल्हाभरात मॉन्सूनपूर्व पावसात विजेचा खेळखंडोबा सुरू असून महावितरणच्या भोंगळ कारभाराचे दर्शन जिल्हावासीयांना झाले आहे. सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांनाही याचा फटका बसून चार-चार दिवस गावे अंधारात होती. महावितरणाच्या अनागोंदी कारभाराला चपराक द्यायची असेल तर वीज ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. यासाठीच उद्या (ता.८) सकाळी ११ वाजता मडूरा तिठा येथील श्रीहनुमान मंदीरात मडूरा दशक्रोशीतील वीज ग्राहकांची बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीमध्ये वीज ग्राहकांना वारंवार उद्भवणाऱ्या समस्या, कमी दाबाचा वीज पुरवठा, गंजलेले विजेचे खांब, जुनाट वीज वाहिन्या, गिरणी, दुकानदार, व्यावसायिक, शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान, वाढीव बिले, आणि मुख्य म्हणजे लवकरच येऊ घातलेले प्रीपेड मीटर आदी समस्यांबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. गावातील गंजलेले वीज खांब, जुन्या वाहिन्या आदींबाबत माहिती घेऊन तसा अहवाल महावितरणच्या वरिष्ठांना पाठविण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. वीज ग्राहक संघटनेने यापूर्वी तालुक्यातील काही विभागात वीज ग्राहकांच्या बैठका घेतल्या असून त्याला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यातून अनेक समस्या मार्गी लागल्या, रखडलेली विजेची कामे सुरू झाली, काही पूर्णत्वास गेली आहेत. परंतु, पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे अजूनही प्रलंबित असून ती पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांवर वीज ग्राहकांचा दबाव असणे आवश्यक आहे. यासाठीच बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा तथा तालुका कार्यकारिणी पदाधिकारी, बांदा व्यापारी संघाचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. वीज ग्राहकांनी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात द्याव्यात, असे आवाहन सावंतवाडी वीज ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT