कोकण

वारिशे हत्या प्रकरणातील गाडी आंबेरकरला परत मिळणार

CD

वारिशे हत्या प्रकरणातील गाडी
आंबेरकरला परत मिळणार
रत्नागिरी ता. ७ः कोदवली पेट्रोल पंपासमोर (ता. राजापूर) येथे पत्रकार शशिकांत वारिशे याची हत्या झाली होती. या प्रकरणी अटकेत असलेल्या पंढरीनाथ आंबेरकर यांची गाडी पोलिसांनी जप्त केली होती. ही जप्त गाडी परत मिळावी अशी आंबेरकर यांच्याकडून करण्यात आलेली मागणी जिल्हा सत्र न्यायालयाने मान्य केली असून १७ लाख रुपयांच्या बंधपत्र घेऊन गाडी द्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कोदवली पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर ६ फेब्रुवारी २०२३ ला ही घटना घडली होती. राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिशे याचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता. घटनेच्या दिवशी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा संशयित पंढरीनाथ आंबेरकर यांच्याविरुद्ध दाखल केला होता. पोलिस तपासामध्ये हा पूर्वनियोजित खून असल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी पंढरीनाथ आंबेरकर याला अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र त्याची गाडी पोलिसांनी जप्त केली होती.
अपघातामधील ही गाडी पंढरीनाथ यांच्या नावावर होती. ही गाडी आंबेरकर याने मे २०२२ विकत घेतली होती. ती आता पोलिस ठाण्यात पडून आहे. या गाडीचे टायर इंजिन, बॅटरीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबासाठी ही गाडी आवश्यक असल्याने ही गाडी परत मिळावी अशी मागणी आंबेरकर याने केली होती. या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार आंबळकर यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी पक्षाचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतल्यानंतर हा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

Sharad Pawar: दुष्काळाचे दुखणे कमी करण्याचा प्रयत्न: शरद पवार : बारामतीतील जिरायती भागात शेतकऱ्यांशी संवाद

Satara Leopard Attack: वीजपुरवठा खंडित झाला अन् बिबट्याने साधला डाव; न्हाळेवाडीत २६ महिन्यांच्या चिमुकल्याचा करुण अंत, आईने फाेडला हंबरडा

IND vs WI: केएल राहुलने धोनीलाही जे जमलं नाही, करून दाखवलं; द्रविडने २००२ मध्ये केलेला विक्रम मोडला

Numerology: या ४ तारखांना जन्मलेल्या मुली वडील आणि नवऱ्यासाठी ठरतात समृद्धीचे प्रतीक! तुमच्या घरातही या तारखेला जन्माला आलीये का मुलगी?

SCROLL FOR NEXT