कोकण

ट्रकच्या धडकेने विजेच्या तारा तुटून खांब वाकले

CD

-rat७p२८.jpg-
२४M८८७२४
चिपळूण ः पोकळी सय्यदवाडी येथे ट्रकच्या धडकेने महावितरणच्या तारा तुटल्या विजेचे खांब वाकले
-------------

ट्रकच्या धडकेत विद्युत खांब जमिनदोस्त

पोफळीतील घटना ; २४ तास वीज पुरवठा खंडित

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः चिपळूणहून कराडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने सय्यदवाडी येथील महावितरणचे दोन खांब जमिनदोस्त केले. त्यामुळे पोकळीतील सय्यदवाडी गुरुवारी रात्रीपासून अंधारात आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम महावितरणकडून सुरू होते. मात्र रात्री उशिरापर्यंत सय्यदवाडी गावाचा वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता.
दापोली तालुक्यातील गौण खनिज घेऊन निघालेला ट्रक रात्री अकरा वाजता शिरगाव सोडून पुढे आला. सय्यदवाडी येथील दफनभूमीच्या रस्त्यालगत असलेले विजेचे खांब त्याने उडवले. पुढे सुलतान सय्यद यांच्या दुकानासमोरील खांब उडवले. रात्री सव्वाअकरा वाजता ही घटना घडली. दोन खांब आणि विद्युत तारा तोडून पुढे ट्रक चालक पसार झाला होता. तारा तुटल्यानंतर येथे मोठा आवाज झाला आणि या भागाचा वीज पुरवठा अचानक खंडित झाल्यानंतर ग्रामस्थ रस्त्यावर आले. त्यावेळी त्यांना वीज खांब आणि तारा तुटलेल्या अवस्थेत आढळले. गावातील ग्रामस्थांनी ट्रकचा पाठलाग करून पुढे पोफळी नाका येथे ट्रक चालकला अडवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांची ही प्रक्रिया सुरू होती. तसेच वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT