कोकण

मंदार कॉलेजमध्ये वृक्षारोपण

CD

-rat८p१७.jpg-
P२४M८८७७७
चिपळूण ः वृक्षारोपण करताना मंदार एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष शैलेजा शिंदे, विश्वस्त सुवर्णा पाटणकर.

मंदार कॉलेजमध्ये वृक्षारोपण

चिपळूण ः तालुक्यातील मंदार एज्युकेशन सोसायटीच्या पेढांबे येथील मंदार कॉलेज परिसरात जागतिक पर्यावरणदिनी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात झाला. सोसायटीच्या व्हाईस चेअरमन शैलेजा शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी संस्थेच्या विश्वस्त सुवर्णा पाटणकर, विविध विभागाचे प्राचार्य उपस्थित होते.
----

नारदखेरकी-देवखेरकी रामपूर
रस्त्याची दुरवस्था

चिपळूण : नारदखेरकी-देवखेरकी ते रामपूर बसस्थानकातपर्यंत १२ किमीचा पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून रस्ता तयार केला; परंतु त्यावर फक्त मातीचा भराव टाकला. त्यानंतर डांबरीकरण केले नसल्याने पावसामुळे रस्ता चिखलमय बनून येथे वारंवार अपघात घडत आहेत. मान्सून पाऊस सुरू झाला. रस्त्यावर पावसामुळे संपूर्ण चिखलमय साम्राज्य तयार झाले आहे. दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. याला सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता माने यांच्याकडे अनेकांनी तक्रारी केल्या; मात्र या रस्त्याची दूरवस्था कायम आहे. तातडीने रस्त्यावर खडी टाकून चिखल होणार नाही याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी. रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
----

लोकमान्य वाचनालयाला
दोन लाखांची देणगी

लांजा ः लोकमान्य वाचनालयाला (कै.) सरस्वतीबाई विनायक देशमुख यांच्या स्मरणार्थ श्रीमती विजया जोशी (पुणे) यांनी दोन लाखांची देणगी दिली. त्यांचे लोकमान्य वाचनालयाच्या संचालक मंडळाकडून अभिनंदन करण्यात आले. या वेळी लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. अभिजीत जेधे, योगेश वाघधरे, जयवंत शेटये, सदानंद देशमुख, राहुल मराठे, महेश सप्रे, अॅड. निरंजन देशमुख, विनोद बेनकर आदी उपस्थित होते.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT