कोकण

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

CD

‘चिपळूण सिटिजन्स’तर्फे
तालुकास्तर वक्तृत्व स्पर्धा
चिपळूण : चिपळूण सिटिजन्स्‌‍ मुव्हमेंटतर्फे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी दिनाचे औचित्य साधून २७ जूनला स्पर्धा चिपळूण येथे होणार आहे. २६ जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ दिन जगभरात साजरा केला जातो. या निमित्ताने अंमली पदार्थाविरोधात मोहीम तसेच प्रचारप्रसार उपक्रमांकासह लोकांना प्रशिक्षण दिले जाते. कोकणामध्ये अमली पदार्थांच्या विरोधात चळवळ उभी करणाऱ्या चिपळूण सिटिजन्स्‌‍ मुव्हमेंटच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. यासाठी तीन गट तयार करण्यात आले आहेत. शालेय गटांतर्गत आठवी ते दहावीचे विद्यार्थी या स्पर्धेसाठी भाग घेऊ शकतात. या गटासाठी ‌‘अंमली पदार्थ सेवन व त्याचे दुष्परिणाम‌’ तसेच ‌‘व्यसनमुक्ती-माझी जबाबदारी‌’ हे दोन विषय ठेवले आहेत. महाविद्यालयीन (ज्युनिअर व सीनिअर) गटासाठी ‌‘से नो टू ड्रग्स‌’ तसेच ‌‘तरुणाई आणि व्यसनाधीनता‌’ व ‌‘मी व्यसनाधीनता कशी रोखू शकतो‌’, असे तीन विषय ठेवले आहेत. खुल्या गटासाठी ‌‘व्यसनाधीनता व पालकांची जबाबदारी‌’, ‌‘नशामुक्त भारत अभियान‌’ व ‌‘तरुण पिढी व्यसनाच्या गरजेत अडकत चालली आहे का’ असे तीन विषय ठेवले आहेत. या स्पर्धेसाठी नावे देण्यासाठी आदिती देशपांडे, अंजली कदम, रूही खेडेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन चिपळूण सिटिजन्स मुव्हमेंटच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC चा नवा आयुक्त कोण होणार? ४ IAS अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा; राजकीय-प्रशासकीय हालचाली वाढल्या

झोपडपट्टी भागातील पाणी समस्या संपणार! १४ किलोमीटरची पाइपलाइन टाकणार; नवा जलप्रकल्प काय? जाणून घ्या...

पुण्यात अवकाळी पावसाने रस्त्यावर साचलं पाणी, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी; रस्ते जलमय

Beautiful People : भारताच्या 'या' टोकावर राहते अशी जमात जिथे लोक जगतात १०० वर्षांपेक्षा जास्त आयुष्य, सत्तरीनंतरही बायका दिसतात तरुण

PNB Scam: माजी लिपिकाचा दोषमुक्तीसाठी अर्ज, पीएनबी बँक घोटाळ्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी

SCROLL FOR NEXT