कोकण

राणेंना जिल्ह्यातील मच्छीमारांची साथ

CD

राणेंना जिल्ह्यातील मच्छीमारांची साथ

रविकिरण तोरसकर : मत्स्यव्यवसाय, पर्यटन विकासाला गती

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : भाजपचे कमळ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात फुलविण्यात सिंधुदुर्गातील मच्छीमार व किनारपट्टी समुदायाचा मोठा वाटा राहिला आहे. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना किनारपट्टी भागात तब्बल १० हजार ७३६ एवढे मताधिक्य मिळाले आहे. राणेंच्या विजयाने मत्स्य व्यवसाय, पर्यटन व इतर पूरक व्यवसायांसाठी केंद्राच्या विविध योजना राबविण्यास बळकटी मिळेल, अशी आशा भाजपच्या मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत तोरसकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आपले प्रतिस्पर्धी विनायक राऊत यांच्यावर ४७ हजार ८५८ मतांनी विजय मिळविला. नारायण राणे यांच्या या नेत्रदीपक विजयात सिंधुदुर्गातील मच्छीमार व किनारपट्टी समुदायाने मोठा वाटा उचलला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ किलोमीटरच्या किनारपट्टीवर देवगड नगरपंचायत तसेच मालवण, वेंगुर्ले अशा दोन पालिका असून, ३५ ग्रामपंचायती आहेत. या सर्व ३८ गावांमध्ये नारायण राणे यांना मताधिक्य मिळाले आहे. जिल्ह्यातील किनारपट्टीवर १०६ मतदान केंद्रे (बूथ) असून, यापैकी ९४ मतदान केंद्रांवर राणे आघाडीवर आहेत. एकंदर मतदानापैकी श्री. राणे यांना २९ हजार २७५ तर पराभूत उमेदवार विनायक राऊत यांना १८ हजार ५३९ मते मिळाली. म्हणजेच महायुतीचे उमेदवार श्री. राणे यांना सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात तब्बल १० हजार ७३६ एवढे मताधिक्य मिळाले. श्री. राणे यांच्या रुपाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ फुलले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वसलेला मच्छीमार तसेच किनारपट्टीवरील इतर समुदायांचा मोठा वाटा आहे. त्याबद्दल सर्व किनारपट्टीवरील मतदारांचे भाजप मच्छीमार सेलतर्फे तोरसकर यांनी आभार व्यक्त केले आहेत. किनारपट्टी भागाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. श्री. राणे यांच्या रुपाने अनुभवी आणि सक्षम खासदार संसदेत गेल्यामुळे किनारपट्टी भागातील समस्या सोडविण्यात मदत होणार आहे. मत्स्यव्यवसाय, पर्यटन व इतर पूरक व्यवसायासांठी केंद्राच्या विविध योजना राबविण्यास बळकटी मिळेल, अशी आशाही श्री. तोरसकर यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT