कोकण

ओसरगाव टोलनाक्‍यावर ट्रकमधील कुलर चोरीस

CD

ओसरगाव टोलनाक्‍यावर
ट्रकमधील कुलर चोरीस

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.८ : ओसरगाव टोलनाक्‍यावर उभ्या असलेल्‍या ट्रकमधून १५ हजाराचा कुलर चोरीला गेला. याबाबतची फिर्याद ट्रक चालकाने आज पोलिसांत दिली. ६ जून रोजी रात्री ११ ते सकाळी सात या दरम्‍यान ही घटना घडली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, चालक बुधाजी भगवान नागोरे (वय ३८, रा.बीड) यांनी गोवा ते मुंबई या प्रवासादरम्‍यान ६ जून रोजी रात्री दहा वाजता ओसरगाव टोल नाक्‍यावर ट्रक (एमएच २३ एयू ५७२७) मुक्‍कामासाठी थांबवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता ते मुंबईच्या दिशेने गेले. नांदगाव तिठा येथे आल्‍यानंतर त्‍यांनी ट्रक थांबवून हौद्यामधील साहित्‍याची मोजणी केली. यावेळी एपीबी कंपनीचा कुलर त्यात नसल्‍याची बाब दिसून आली. त्‍यानंतर ट्रक चालक बुधाजी नागोरे याने ६ जून रोजी रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत पंधरा हजाराचा कुलर चोरीला गेल्‍याची फिर्याद दाखल केली. या प्रकरणी अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT