कोकण

ठाकरे गटाच्या पाठपुराव्याने बांद्यात रस्त्याचे काम सुरू

CD

88894


ठाकरे गटाच्या पाठपुराव्याने
बांद्यात रस्त्याचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ८ ः येथील जलजीवन योजनेचे काम करण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. त्यामुळे नाबर शाळा ते खेमराज हायस्कूल या रस्त्याची बाजूपट्टी कमकुवत होऊन रस्ता खड्डेमय झाला होता. याबाबत ग्रामपंचायत सदस्य तथा ठाकरे शिवसेनेचे बांदा शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी संबंधित ठेकेदाराकडे पाठपुरावा करत शाळा सुरू होण्यापूर्वी काँक्रिट करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर आजपासून या रस्त्यावरील बाजूपट्टीचे काँक्रिटीकरण व खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
बांद्यात जलजीवन योजनेच्या कामासाठी रस्त्याच्या बाजूला खोदाई करण्यात आली होती; मात्र काम झाल्यानंतर बाजूपट्टी मजबुतीकरण तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात दिरंगाई करण्यात येत होती. याबाबत काणेकर यांनी संबंधित ठेकेदाराला हे काम पूर्ण केल्याशिवाय इतर काम करू देणार नसल्याचा इशारा दिला होता. अखेर हे काम आजपासून सुरू करण्यात आल्याची माहिती काणेकर यांनी दिली. पावसाळ्यापूर्वी हे काम सुरू करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक तसेच स्थानिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: ट्रेन समोर… तरीही थांबले नाहीत! मुलुंड स्टेशनवर ट्रॅकवरच सुरू ‘फिल्मी’ मारामारी, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

एकता कपूर यांनी त्यांच्या कथांना महिला सशक्तीकरणाचे माध्यम असल्याचे सांगितले, मांडला आपला दृष्टिकोन

Australia Cricket Contract: ऑस्ट्रेलियाच्या करारात २१ खेळाडूंनाच स्थान; मॅक्सवेलसह नामांकित खेळाडूंना वगळलं; पाहा संपूर्ण यादी

Stock Market Today: ट्रम्पच्या भूमिकेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी! Indigo चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'ओडिशा स्थापना दिना'निमित्त दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT