कोकण

-व्यापाऱ्यासह कामगाराची कर्मचाऱ्यांना दमदाटी

CD

व्यापाऱ्यासह कामगाराची दमदाटी

चिपळुणातील प्रकार ; पोलिस देणार समज
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः बाजारपेठेतील गटारे व गटारांबाहेर माल, साहित्य लावणाऱ्या व्यापाऱ्यांचे अतिक्रमण हटवताना गुरूवारी एका व्यापारी व त्याच्या कामगाराने पालिका कर्मचाऱ्यांशी बाचाबाची करून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रशासनाने तक्रारअर्ज दिला आहे. त्यानुसार पोलिस या दोघांना समज देणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी अधिकाऱ्यांसह बाजारपेठेची पाहणी करून व्यापाऱ्यांना गटारे व गटारांबाहेर माल न लावण्याच्या सूचना दिल्या तसेच त्याचे पालन न केल्यास माल जप्त करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार गुरूवारी अतिक्रमणविरोधी पथकप्रमुख संदेश टोपरे, बांधकाम विभागाचे कर्मचारी विनायक सांवत हे इतर कर्मचाऱ्यांना घेऊन बाजारपेठेत कारवाई करत असताना व्यापारी सलिम मेमन व कर्मचारी जमीर जैनुदीन सय्यद यांनी कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत दमदाटी करत अतिक्रमणाचे साहित्य ताब्यात घेत असताना झटापट केली. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी या दोघांवर कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रारअर्ज दिला आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांमार्फत संबंधित व्यावसायिक व त्याच्या कामगाराला समज देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT