कोकण

शीळ धरणाच्या पाईपलाईनचे काम मार्गी

CD

शीळ धरणाच्या जलवाहिनीचे काम मार्गी
शहरवासीयांना दिलासा ः नैसर्गिक उताराने येणार जॅकवेलमध्ये पाणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : अखेर शीळ धरणापासून ते जॅकवेलपर्यंतच्या ५५० मीटरच्या जलवाहिनीचे पाईप कोलकात्याहून दाखल झाले आहेत. त्यामुळे वर्षभर रखडलेले हे काम काही दिवसांत पूर्ण होऊन शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. फ्लोटिंग पंप पावसाळ्यात वाहून जाण्याची भीती आता संपली असून, लवकरच जलवाहिनीतून जॅकवेलमध्ये नैसर्गिक उताराने पाणी येणार आहे.
सुधारित पाणी योजनेमध्ये हे काम होते; परंतु वर्ष झाले तरी या कामाकडे त्या गांभीर्याने लक्ष देण्यात आले नव्हते. जॅकवेल खचल्यानंतर तात्पुरता फ्लोटिंग पंपांचा पर्याय काढला होता. आजवर त्या फ्लोटिंग पंपाद्वारेच शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. यंदाच्या पावसाळ्यात शीळ नदीला पूर आल्यास फ्लोटिंग पंप वाहून जाण्याची भीती होती. तसे झाले तर पुन्हा शहरावर पावसाळ्यात पाणी-पाणी करायची वेळ आली असती. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यामध्ये लक्ष घातल्यावर या कामाला गती आली. पावसापूर्वी हे काम पूर्ण करण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती.
पालिका प्रशासनाकडून या जलवाहिनीचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी आवश्यक असलेले पाईप मागविले होते. ५५० मीटरसाठी आवश्यक पाईप आले असून, शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत टाकण्याचे काम सुरू झाले आहे.


वीजबिलाचे दोन लाख रुपये वाचणार
फ्लोटिंग पंप सुरू झाल्यापासून महिन्याला या चार पंपांचे सुमारे २ लाख वीजबिल पालिकेला भरावे लागते. त्यात पाऊस जास्त झाला, तर फ्लोटिंग पंप वाहून जाण्याची भीती होती; परंतु या जलवाहिनीचे काम झाल्यानंतर वीजबिलाचा आणि फ्लोटिंग पंप वाहून जाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.


८८८११
८८८१२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT