कोकण

सावंतवाडीतील ‘ते’ स्टॉल हटविले

CD

88912

सावंतवाडीतील ‘ते’ स्टॉल हटविले

पालिकेची कारवाई : विक्रेत्यांच्या मुदतवाढीच्या मागणीला नकार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः शहरातील भाजी मार्केटमध्ये आणि रस्त्यावर अशा दोन्ही ठिकाणी टपरी घालून बसणाऱ्या विक्रेत्यांवर आज पालिकेने कारवाईचा बडगा उगारला. पालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईबाबत विक्रेते व्यापाऱ्यांत नाराजी असून, आंबा हंगाम संपेपर्यंत किंवा वटपौर्णिमेपर्यंत बाहेर बसण्याची परवानगी द्या, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे, तर वाहतुकीला होणारा अडसर लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
मुदतवाढीच्या कोणत्याही सूचना आल्या नसल्याने मुख्याधिकाऱ्यांनी स्टॉल खाली करून घेण्याचे आदेश आम्हाला दिले आहेत, त्यानुसार आम्ही ही कारवाई करत आहोत, अशी माहिती कर निरीक्षक रचना कोरगावकर यांनी दिली. लवकरच रस्त्यावर व्यापारासाठी बसणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांचे मार्केटमधील टपरी स्टॉल हटवणार आहोत, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, पालिकेच्या या कारवाईला काही व्यापाऱ्यांकडून याला विरोध करण्यात आला, मात्र पालिका कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मार्केटमधील स्टॉल हटविले. मार्केटमध्ये येऊन व्यापार करा; अन्यथा सर्व स्टॉल हटविणार, असा इशाराही देण्यात आला. यावेळी पालिका प्रशासनाचे कर्मचारी दिनेश भोसले, रिजवान शेख उपस्थित होते. याबाबत व्यापाऱ्यांशी संवाद साधला असता, ‘‘मार्केटमध्ये आंब्यांना ग्राहक नसल्यामुळे आम्हाला रस्त्यावर बसावे लागत आहे. आंब्यांचा हंगाम अद्याप संपलेला नाही, त्यामुळे पालिकेकडे आठ दिवसांची मुदत वाढवून मागितली आहे; मात्र तरीही ही कारवाई करण्यात आली, असे सांगितले. आम्ही पुढचे आठ दिवस इथेच व्यापारासाठी बसणार आहोत, असेही स्पष्ट केले. यावेळी अनिल मठकर, विमल पावसकर, आरती मठकर, श्याम सांगेलकर, राजा खोरागडे, दीपाली राऊळ, सुलभा जामदार, सुषमा राऊळ, रेश्मा खोडागरे आदी विक्रेते उपस्थित होते.
....................
कोट
आंब्याच्या हंगामात बाहेर बसण्याची परवानगी देण्यात आली होती; मात्र मुदत वाढवून देऊन सुद्धा विक्रेते, व्यापारी ठाम राहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. कोणावरही अन्याय केला नाही.
- सागर साळुंखे, मुख्याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT