कोकण

वाफोलीत कॅन्टरची डंपर चेसला धडक

CD

88921

वाफोलीत कॅन्टरची डंपर चेसला धडक

एक जखमी ः दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ८ ः बांदा-दाणोली मार्गावर वाफोली डोंगरीकर हॉटेल जवळ कॅन्टर व डंपर (चेस) यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यामध्ये मालवाहक कॅन्टरचालक किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर बांदा प्राथमिक उपकेद्रांत उपचार करून घरी पाठविण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी सांगितले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. हा अपघात आज पहाटे झाला. याबाबत सायंकाळी उशिरा बांदा पोलिसांत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बांदा-दाणोली मार्गावर दोन्ही बाजूस झाडे-झुडपे वाढलेली आहेत. वळणावर समोरून येणारे वाहन चालकाला दिसत नाही. सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. हा अपघात पूर्णत: बांधकाम विभागाच्या बेजबाबदारपणामुळे घडला असल्याचा आरोप विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांनी केला आहे.
या मार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. काही ठिकाणी रस्ता अरुंद व वळणावळणाचा आहे. दाणोली, सातोळी-बाळवाट, सरमळे, विलवडे, वाफोली, बांदा ही गावे येतात. कोल्हापूर, पुणे, बेळगाव, गोव्यात जाणारे पर्यटक याच मार्गाचा वापर करतात. या मार्गावर उतार व वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने बरेच अपघात झाले आहेत. या मार्गावर दिशादर्शक व वेग मर्यादा फलक लावणे गरजेचे आहे. काही ठिकाणी रस्ता अरुंद व वळणावळणांचा आहे. संबंधित विभागाने रस्त्याचा सर्व्हे करणे गरजेचे आहे. यापुढे जीवितहानी, नुकसान झाल्यास संबधित विभाग जबाबदार राहील. संबंधित विभागाने गणेश चतुर्थीपूर्वी दखल न घेतल्यास माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी बांधकाम विभाग कार्यालयात धडक देणार, असा इशाराही सरपंच दळवी यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT