कोकण

करिअर मार्गदर्शनामुळे नवी दालने

CD

88943

करिअर मार्गदर्शनामुळे नवी दालने

अ‍ॅड. अजित गोगटे ः जामसंडेत कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ८ ः दहावी, बारावी परीक्षांनंतर मध्यम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरसंबधी माहिती मिळावी, यासाठी जामसंडे येथील सांस्कृतिक भवनमध्ये विनामूल्य मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली. विद्यार्थ्यांना नवनवीन दालने यातून खुली होतील, असा विश्‍वास माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे यांनी यावेळी व्यक्त केला. माजी आमदार अप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. याला परिसरातील विद्यार्थ्यांसह पालकांचा प्रतिसाद लाभला.
अ‍ॅड. गोगटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाई बांदकर, गुरुदेव परुळेकर, श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक संजय गोगटे आदी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. गोगटे यांनी करिअर मार्गदर्शनाची गरज स्पष्ट केली. विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनाचा लाभ होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. भाई बांदकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला. माजी आमदार अप्पासाहेब गोगटे जन्मशताब्दी वर्षातील एक पुष्प म्हणून अ‍ॅड. अजित गोगटे आणि परिवारातर्फे याचे आयोजन केले होते. हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, फॅशन डिझायनिंग, इंटीरिअर डिझायनिंग, संगणक, संगीत, आय.टी.आय., कृषी तसेच किसान मोर्चातर्फे ‘शेती एक व्यवसाय’ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सागर बांदकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी भाई बांदकर यांनी करिअर मार्गदर्शन केले. अ‍ॅकॅडमिक एज्युकेशन गुरुदेव परुळेकर यांनी, यशवंत भोसले इंजिनिअरिंग कॉलेज सावंतवाडीचे मिलिंद देसाई, एन.आय.बी.आर. कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, पुणेचे सतीश ब्राह्मणे, फ्लोरेट कॉलेज ऑफ इंटीरिअर डिझायनिंग अ‍ॅन्ड फॅशन डिझायनिंग, कणकवलीच्या मृणाली सावरकर, किशोर कदम, मुकुंद फाटक नर्सिंग कॉलेज, देवगडचे प्रकाश ढाले, विद्या विकास मंडळ कनिष्ठ महाविद्यालय, जामसंडेचे संजय गोगटे आणि श्री. पाटील, आय.टी.आय. जामसंडेचे सूरज भिडे, धनश्री कन्सल्टन्सी इन्श्युरन्स सेक्टर प्रीती देवधर, छायाचित्रण वैभव केळकर, ‘पत्रकारिता एक करिअर’वर दयानंद मांगले, ‘संगीत एक करिअर’ विषयावर अभिनव जोशी यांनी, तर शिरगाव हायस्कूलच्या सिद्धी कदम यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, कार्यक्रमस्थळी विविध स्टॉल लावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT