कोकण

महावितरण सेवा देण्यात अपयशी

CD

88924
महावितरण सेवा देण्यात अपयशी

मडुरावासीयांचा आरोप ः वीज ग्राहकांच्या बैठकीत कारभाराबाबत संताप व्यक्त

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ८ ः मडुरा दशक्रोशीतील वीज ग्राहकांच्या विभागीय बैठकीत महावितरण अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल संतापाचा सूर उमटला. वेगवेगळे कर आकारून ग्राहकांची लूटमार सुरू असताना ग्राहकांना सेवा देण्यात मात्र महावितरण पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून ग्राहकांच्या तक्रारींवर प्रशासकीय पातळीवरून थेट वीज मंत्रालयात पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना आणि बांदा व्यापारी संघाच्या माध्यमातून वीज समस्यांवर चर्चा करण्यासाठी विभागीय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, सचिव निखिल नाईक, समन्वयक गणेश बोर्डेकर, सदस्य रामचंद्र राऊळ, मडुरा सरपंच उदय चिंदरकर, कास सरपंच प्रवीण पंडित, सातोसे सरपंच प्रतीक्षा मांजरेकर, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, मळगाव माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, आरोस माजी सरपंच केशव नाईक, मडुरा उपसरपंच बाळू गावडे, बांदा व्यापारी संघाचे खजिनदार मंगलदास साळगावकर आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीपासूनच वीज ग्राहकांनी आक्रमक पवित्रा घेतला. निकृष्ट वीज खांब, जीर्ण विद्युतवाहिन्या, सहाय्यक अभियंता यांची उडवाउडवीची उत्तरे, मोबाईल बंद ठेवणे, कमी दाबाचा वीजपुरवठा, वारंवार वीज गायब होणे, नादुरुस्त मीटर, विद्युत वाहिन्यांवरील झाडीझुडपे सफाई न करणे अशा आशयाच्या अनेक तक्रारी या बैठकीत करण्यात आल्या. यावेळी सातोसे उपसरपंच रुपेश साळगावकर, वसंत धुरी, दाजी सातार्डेकर, सदाशिव गाड, बाबा सावंत, यशवंत माधव, माधुरी वालावलकर, मोहन गवस, प्रकाश वालावलकर, दिनेश नाईक, प्रवीण नाईक, गौरेश परब, अरुण परब, सिद्धेश नाईक, दत्ताराम परब, शंकर परब, प्रसाद मांजरेकर, अमोल मेस्त्री, विजय वालावलकर, संतोष जाधव, सुधीर नाईक, सुभाष गावडे, मंदार वालावलकर, पांडुरंग पंडित, कृष्णा अमरे, विद्याधर नाईक, बाबली परब, घनःश्याम गावडे, मंदार नाईक, तुकाराम कांबळी, नंदू परब, गोपाळ सातार्डेकर आदींसह परिसरातील वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मंगलदास साळगावकर यांनी केले. आभार सुरेश गावडे यांनी मानले.
---
समस्यांबाबत तक्रारी करा ः ॲड. वेंगुर्लेकर
ॲड. वेंगुर्लेकर म्हणाले, ‘‘महावितरण कंपनी विविध कर आकारून वीज ग्राहकांची लूटमार करीत आहे. पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे अद्याप केलेली नाहीत. त्यामुळे पहिल्याच पावसात ग्रामीण भागात चार-पाच दिवस वीज गायब होती. महावितरणशी सामूहिक लढा देताना समस्यांची लेखी तक्रार करा. संघटनेच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

SCROLL FOR NEXT