कोकण

पहिल्याच पावसात मोरी खचली पहिल्याच पावसात मोरी खचली

CD

88968

पहिल्याच पावसात मोरी खचली

नाटळच्या मुख्य रस्त्याची दैना ः निकृष्ट कामाचा ग्रामस्थांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
कनेडी, ता. ९ ः नाटळ गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. पहिल्याच पावसात मोरी खचल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, नाटळ येथे मुख्य रस्त्याचे काम गेले तीन महिने सुरू आहे. अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. दोन महिन्यांपासून एसटी वाहतूक बंद झाली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. शिवाय, या कामाचा दर्जा सुद्धा खालावला आहे. नाटळला जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम पंतप्रधान ग्रामसडक निधीतून मंजूर आहे. तीन महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. दोन वेळा भूमिपूजन करून या रस्त्याचे श्रेय लाटण्यात आले. या रस्त्याच्या कामाचा दर्जा एकदम खराब आहे. या रस्त्यावर चार ठिकाणी मोऱ्या बांधण्यात आल्या. पैकी दोन मोऱ्यांचे काम झाले आहे. पाऊस झाला तरी आणखी दोन मोऱ्या पूर्ण झालेल्या नाहीत. पाणी निचरा होण्यासाठी बांधण्यात आलेल्या मोऱ्यांचे काम दर्जाहीन आहे. एका मोरीच्या बांधकामातील काँक्रीटला तडा गेलेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. गेले दोन महिने दळणवळणासाठी रिक्षा हाच एक मार्ग आहे. पण, आता पाऊस सुरू झाल्यामुळे या ठिकाणी रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे. त्यामुळे रहदारी पूर्णपणे थांबली आहे. आता हा रस्ता पूर्ण होणार की नाही, अशी चिंता ग्रामस्थांना आहे. एसटी बंद असल्यामुळे विद्यार्थी, प्रवाशांची अडचण झाली आहे. आता शाळा-महाविद्यालाये सुरू होणार असल्यामुळे शाळेतील मुलांना जाण्या-येण्याचा मार्ग हा बंद झालेला आहे. जिल्हा बांधकाम विभागाने तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
------
ग्रामस्थांच्या माहितीनुसार...
- पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून निधी मंजूर
- कामाचे दोनदा भूमिपूजन, त्यासाठीही श्रेयवाद
- तीन महिन्यांपासून मुख्य रस्त्याचे काम
- दोन महिन्यांपासून एसटी वाहतूक बंद
- एका मोरीच्या बांधकामाला तडा
- शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची गैरसोय
-----
कोट
नाटळ गावातील काही वाड्या-वस्त्यांवर जाणाऱ्या रस्त्यावर तीन महिन्यांपासून काम सुरू आहे. मात्र, हे निकृष्ट दर्जाचे काम आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाली. मोरीच्या बांधकामाला तडे गेले. बांधकाम विभागातील अभियंते दुर्लक्ष करीत असल्याने ठेकेदाराने निकृष्ट काम केले. त्यामुळे ग्रामस्थांना याचा नाहक त्रास होत आहे. एसटी बस सेवा बंद आहे. याला जबाबदार कोण, हा रस्ता योग्य पद्धतीने झाला पाहिजे.
- समीर सावंत, ग्रामस्थ, नाटळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT