कोकण

स्टेशनरीसह वह्यांच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ

CD

88984

स्टेशनरीसह वह्यांच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ
पालकांना महागाईची झळ ; शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ : तालुक्यातील शाळा १५ जूननंतर सुरू होत असून पालक व विद्यार्थी वह्या, पुस्तके, दप्तरासह शालेय साहित्य खरेदीसाठी दुकानात गर्दी करत आहेत. या वर्षी शालेय स्टेशनरी व वह्यांच्या किमतीत सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाल्याने विद्यार्थी व पालकांना महागाईची झळ सोसावी लागत आहे.
इंधनाचे वाढलेले दर, विविध देशांमधील युद्ध परिस्थिती व त्यामुळे निर्माण झालेली कागद टंचाई याचा शालेय साहित्य दरवाढीवर परिणाम झाला आहे. पेन्सिलपासून लाँगबुकपर्यंत सर्वच किमती वाढल्याने पालकांचे शैक्षणिक बजेट कोलमडले आहे. ज्या पालकांना दोन किंवा त्यापेक्षा अधिक मुले आहेत त्यांचा यावर्षीचा खर्च वाढणार आहे. शहर व ग्रामीण भागातील दुकानांमध्ये मोठ्या व लहान आकाराच्या वह्या, चित्रकला वही, प्रयोगवही, दप्तरे, नव्या वर्गाची पाठ्यपुस्तके, टिफिन, पेनपेन्सिल, कंपासपेटी, पाण्याची बाटली, खोडरबर, टोकयंत्र, पुस्तके कव्हर, गम यांसारख्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालक व मुले दुकानात गर्दी करत आहेत. यावर्षी विद्यार्थ्यांचा बदलता ट्रेंड लक्षात घेता केजी टू पीजीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी वह्यांवरील नवनवीन आकर्षक मुखपृष्ठ नामांकित कंपन्यांनी तयार करून बाजारात आणल्या आहे. यात चित्रपट कलाकार, बीटीएस कलाकार, क्रिकेट व इतर खेळाडू ,धबधबे, डोंगरदऱ्या असे नैसर्गिक देखावे, देश-विदेशातील उंच व प्रसिद्ध इमारती, स्थापत्य नमुने, कार्टून अशी एकापेक्षा एक सरस मुखपृष्ठ असलेल्या आकर्षक वह्या मुलांना आकर्षित करत आहेत.

चौकट
किमतीमध्ये वाढ
३ रुपयाची साधी पेन्सिल ५-७ रुपयांना तर १० रुपयांचे पेन १५ रुपयांवर पोहचले आहे. लहान वह्यांच्या किमतीत डझनला ६० रुपयांची वाढ झाली आहे याशिवाय कंपास आणि कंपास साहित्य १५ टक्क्यांनी तर विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरचे दर १५ टक्क्यांनी वाढले आहेत. स्‍कूल बॅग व टिफिनचे शेकडो प्रकार दुकानात उपलब्ध असल्याने त्यांची खरेदीही वाढली आहे.

कोट
शैक्षणिक साहित्यांच्या किमती यावर्षी वाढल्या आहेत. तरीही विविध दर्जेदार कंपन्यांनी आपली असंख्य उत्पादने बाजारात आणली आहेत बाजारामध्ये स्पर्धा असल्याने ग्राहकांना सवलतीदेखील दिल्या जात आहेत.
- मंगेश भागडे, शिरगाव

चौकट
शालेय साहित्यदर
- मोठी वही १०० पानी - ३८ - ६० रु.
- २०० पानी - ६० -७५ रु.
- वह्या लहान १०० पानी : ३० -४५ रु.
- एफोर १५० पानी : ७५ -८५ रु.
- २०० पानी : ८५ -१०० रु.
- कंपासपेटी -१०० ते ३५०
- स्कूल बॅग - ३५० -२ हजार रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT