कोकण

संक्षिप्त

CD

‘सह्याद्री कुणबी’तर्फे
मोफत वाचनालये
खेड ः पुणे शहर सह्याद्री कुणबी संघाच्या माध्यमातून ''जिथे जिथे शाळा तिथे तिथे वाचनालय'', या संकल्पनेतून खेड व दापोली तालुक्यात ५ ठिकाणी मोफत वाचनालये सुरू करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करून विद्यार्थ्यांना भौगोलिक ज्ञानप्राप्तीसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. मोफत वाचनालय उपक्रमांतर्गत खेड तालुक्यातील संत तुकाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तुंबाड न्यू इंग्लिश स्कूल, पन्हाळजे न्यू इंग्लिश स्कूल, होडखाड न्यू इंग्लिश स्कूल व दापोली तालुक्यातील दमामे न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी वाचनालये सुरू करण्यात येणार आहेत. ज्यांच्याकडे पुस्तके उपलब्ध असल्यास सामाजिक दायित्व म्हणून पुस्तकांचे संच दत्ता चिनकटे, नितीन शिगवण यांच्याकडे सुपूर्द करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

------
मानसिक आजार
बरे होतातःकासार
खेड ः धकाधकीच्या जीवनशैलीत कोणाला कोणासाठी वेळ नाही. सुसंवाद कमी झाला आहे. चार माणसांच्या कुटुंबात एकाला मनोविकाराची लागण हे ठरलेले आहे. लवकर निदान व उपचार केले तर मनोविकार पूर्णपणे बरे होऊ शकतात. काही रुग्ण आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचतात. त्यांना देखील योग्य समुपदेशन तसेच औषधोपचार करून बरे करता येते, असे मत डॉ. निकेत कासार यांनी व्यक्त केले. सध्याच्या जीवनशैलीमुळे समाजात मनोरुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच खेड जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनने नुकतेच भरणे येथील साईरिसॉर्ट येथे सुप्रसिद्ध मनोविकार चिकित्सक डॉ. निकेत कासार यांच्यामार्फत खेडमधील डॉक्टरांचे मनोविकार व उपचार याबाबत प्रशिक्षण आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी खेड जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्याम गिल्डा, सचिव डॉ. आदेश भोसले, खजिनदार डॉ. सिद्धेश चिखले, डॉ. नीलेश भोसले तसेच डॉ. तुषार मोरे, डॉ. दीपक मोरे, डॉ. राठोड, डॉ. मलंणगावकर, डॉ. स्वामी यांसह अनेक डॉक्टर्स उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. वैदेही शेळके यांनी केले.

----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : बुलढाण्यात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

SCROLL FOR NEXT