कोकण

पहिली ते आठवी प्रवेशाचे अर्ज संपुष्टात

CD

पहिली ते आठवी
प्रवेशाचे अर्ज संपुष्टात
रत्नागिरी, ता. ९ः जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पहिली ते आठवीची प्रवेशअर्ज देणे-घेण्याची मुदत मे अखेरीस संपली असल्यामुळे विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू झाली आहे. प्रवेशअर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी विद्यालय परिसरात विद्यार्थी व पालकांची वर्दळ वाढली आहे.
सर्वच शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनला सुरू होणार आहे. तत्पूर्वी नवीन प्रवेशितांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यात येते. या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये राबवण्यात आलेली पहिली, पाचवी, आठवीची प्रवेशप्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून, प्रवेशअर्जांच्या देवाण-घेवाणीसाठीची मुदत मे अखेर संपली आहे. त्यामुळे प्रवेशअर्ज व आवश्यक कागदपत्रांसाठी विद्यार्थी पालकांची लगबग सुरू आहे.
एक जूनपासून कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली आहे. या वर्षी सर्व शाळांना आपापल्या स्तरावर प्रवेशप्रक्रिया राबवण्याचे अधिकार शिक्षण विभागाने शाळा मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्यामुळे शाळांनी आपापले नियोजन करून प्रवेशप्रकिया राबवली आहे. दरम्यान, शहरातील नामांकित शाळांमध्ये आलेल्या प्रवेशअर्जामधून लकीड्रॉद्वारे प्रवेश दिले जाणार आहेत. प्रवेशप्रक्रियेमुळे शाळा परिसरांमध्ये विद्यार्थी व पालकांची वर्दळ वाढली आहे. पाल्याच्या प्रवेशप्रक्रियेच्या पूर्ततेसाठी पालकांची धावपळ सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT