कोकण

चिपळुणातील हॉटेलमध्ये आग लागल्याने धावाधाव

CD

89027

चिपळुणातील हॉटेलमध्ये
आग लागल्याने धावाधाव
चिपळूण, ता. ९ : पागनाका परिसरातील महामार्गालगत असणाऱ्या एका हॉटेलमध्ये शॉर्टसर्किटने रविवारी दुपारी आग लागली. या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवण्यात आले. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या आगीत हॉटेल व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा सांयकाळी उशिरापर्यंत सुरू होता.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पागनाका भागात साहिल दिवेकर यांचे हॉटेल आहे. या हॉटेलच्या किचनमधून दुपारी एक वाजता अचानक धूर येण्यास सुरवात झाली. हॉटेलमधील चिमणीच्या ठिकाणी आग लागल्याचे लक्षात घेताच कामगारांची एकच धावाधाव उडाली. हॉटेल परिसरात धुराचे प्रमाण वाढत होते. ही गोष्ट चिपळूणचे माजी प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी आगीची खातरजमा करून तत्काळ पालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. वाहनचालक सुनील भोजने, फायरमन भूषण भोजने, अमोल वीर, योगेश दळवी, शुभम चिवेलकर, वैभव फणसे आदी जवानांनी परिश्रम घेतले. आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत चिमणी पूर्णत: जळून खाक झाली आहे तर अन्य साहित्य व यंत्रसामुग्रीसुद्धा जळून संबंधित व्यावसायिकाचे नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT