कोकण

चिपळूण- महाविकास आघाडीला विधानसभेतही आघाडी मिळेल

CD

89048

महाविकास आघाडीला विधानसभेतही यश
रमेश कदम ; स्वार्थासाठी गेलेल्यांचा विचार करायचा नाही
चिपळूण, ता. ९ : चिपळूण विधानसभा मतदार संघातील मतदार शरद पवार यांच्यामागे उभे आहेत. ते विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहेत. विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पर्यायाने महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळेल, असा विश्वास माजी आमदार रमेश कदम यांनी व्यक्त केला.
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक चिपळुणात झाली. या वेळी लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी तसेच लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या अभिनंदनाचा ठराव या बैठकीत मांडण्यात आला. या ठरावाला सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते मंजुरी दिली.
बैठकीला मार्गदर्शन करताना रमेश कदम म्हणाले, चिपळूणची जनता शरद पवार यांच्यामागे उभी आहे. ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चिपळूणमधून मताधिक्य दिले त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदार प्राधान्य देतील. स्वार्थासाठी शरद पवार यांना सोडून कोण कुठे गेला, याचा विचार करायचा नाही. आपण प्रामाणिकपणे शरद पवार यांच्याबरोबर राहून महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करूया. महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करून विधानसभेत यश संपादन करतील. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेशशेठ बने, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT