कोकण

घरपट्टी, पाणीपट्टी थकीतचे प्रमाण वाढले

CD

घरपट्टी, पाणीपट्टी थकीतचे प्रमाण वाढले
जिल्हा परिषद ः घरपट्टीचे १२ कोटी ७९ लाख थकीत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीकडून केलेली घरपट्टी व पाणीपट्टी वसुली यंदा कमी झाली आहे. पाणीपट्टी ८५ टक्के तर घरपट्टीची ७७ टक्के वसुली झाली आहे. घरपट्टीचे १२ कोटी ७९ लाख ७६ हजार तर पाणीपट्टीचे ३ कोटी ५४ लाख ३६ हजार रुपये थकीत राहिले आहेत.
सर्वाधिक कमी वसुली ही गुहागर तालुक्यात झाली आहे. घरपट्टी तर फक्त ३३ टक्केच आहे. जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागांतर्गत विविध योजना, ग्रामपंचायत स्तरावरून राबविण्यात येत असतात. या मुख्य म्हणजे पाणीपुरवठा योजना, घरकुल योजनांचा अधिक भर असतो. गावात पाणीपुरवठा केल्यानंतर गावात कर वसुली ग्रामपंचायतींना करावी लागत असते. या करवसुलीतून मिळणार्‍या रकमेतून योजनावरील वीजबिल देयके, दुरुस्ती केली जाते. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमार्फत गावपातळीवर आपापल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांकडून घरपट्टी, पाणीपट्टी कराची वसुली करण्यात येते. यानुसार दरवर्षी मार्च अखेरपर्यंत जास्तीतजास्त कर वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. ग्रामपंचायत, तालुका व जिल्ह्याचा विकास व्हायचा असेल तर सरकारकडून मिळणाऱ्‍या निधीवर विसंबून न राहता घरपट्टी आणि पाणीपट्टी यांच्यातून विकास साधण्याचे गरजेचे आहे. प्रत्येक गावांतील नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुली केली जाते. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी घरपट्टी व पाणीपट्टी कोट्यवधीच्या घरात शिल्लक राहिली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गोळा होणारा हा महसूल अनेक विकासकामांवर परिणाम करणारा ठरत आहे.


गुहागर, खेड तालुक्यात
सर्वात कमी वसुली
यावर्षी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे सर्वाधिक कमी वसुलीचे प्रमाण गुहागर व खेड तालुक्यात दिसत आहे. घरपट्टीमध्ये गुहागर तालुक्याने अवघे ३३.८७ टक्के वसुली केल्याने जिल्ह्याचा वसुलीचा टक्का घसरला आहे. त्याचबरोबर खेड तालुक्याने ७० टक्के वसुली दिली आहे. उर्वरीत तालुक्याने मात्र ९० टक्केच्या पुढे वसुली आहे. यावर्षी पाणीपट्टी मात्र बऱ्‍यापैकी वसुली झाली आहे. पाणीपट्टी ८५.२७ टक्के इतकी झाली आहे. यामध्ये खेड तालुक्यात सर्वाधिक कमी वसुली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT